ट्रक ड्रायव्हर नवऱ्यासोबत त्याचा दोस्त घरी यायचा, बायको प्रेमात पडली,...मोठं कांड केलं, प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावले
Crime News Marathi : मृत अमित सिंह हे व्यवसायाने ट्रक चालक होते. ते मदनपूर पनियार गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, अमित यांचा दीपक नावाचा मित्रही ट्रक चालक होता. दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याने दीपकचे अमित यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. याच दरम्यान अमित यांची पत्नी शिल्पी सिंह आणि दीपक यांच्यात प्रेमसंबंध जुळल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ट्रक ड्रायव्हर नवऱ्यासोबत त्याचा दोस्त घरी यायचा, बायको प्रेमात पडली,..
.मोठं कांड केलं, प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावले
Crime News Marathi : उत्तर प्रदेश मधील सुल्तानपूर जिल्ह्यात अनैतिक संबंधांतून पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लंभुआ कोतवाली हद्दीतील मदनपूर पनियार गावात एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी असलेल्या प्रियकराच्या शोधासाठी विशेष पथके रवाना झाली आहेत.
मृत अमित सिंह हे व्यवसायाने ट्रक चालक होते. ते मदनपूर पनियार गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, अमित यांचा दीपक नावाचा मित्रही ट्रक चालक होता. दोघांमध्ये घट्ट मैत्री असल्याने दीपकचे अमित यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. याच दरम्यान अमित यांची पत्नी शिल्पी सिंह आणि दीपक यांच्यात प्रेमसंबंध जुळल्याचे समोर आले आहे.
कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पी आणि दीपक यांच्या संबंधांची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर घरात वाद निर्माण झाला होता. त्यावेळी समज देऊन प्रकरण शांत करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही दोघांमध्ये संपर्क सुरूच होता. या संबंधांना अमित यांचा विरोध असल्याने त्यांना मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : जालन्यात विवाहितेचा अमानुष छळ, माहेरहून पैसे आणण्यास टाकला दबाव, पीडितेनं गळफास घेत संपवलं जीवन










