'तिच्यासाठी सगळ्यांना सोडलं, अन् आता तीच सोडून गेली'; सासूसोबत पळून गेलेल्या जावयाला गुलीगत धोका

मुंबई तक

Crime News Marathi : राहुलचा आरोप आहे की, अनिता दोन लाख रुपये रोख, एक सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन अंगठ्या घेऊन पळून गेली. तसेच तिने त्याला फसवण्यासाठी तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचा गंभीर आरोपही त्याने केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, अनीताने त्याला तावीज घालायला भाग पाडले आणि मानसिकदृष्ट्या आपल्या प्रभावाखाली ठेवले. हा सगळा प्रकार आयुष्याची कमाई आणि मौल्यवान वस्तू हडप करण्यासाठी रचल्याचा दावा राहुलने केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News Marathi
Crime News Marathi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'तिच्यासाठी सगळ्यांना सोडलं, अन् आता तीच सोडून गेली'

point

सासूसोबत पळून गेलेल्या जावयाला गुलीगत धोका

Crime News Marathi : दहा महिन्यांपूर्वी देशभरात खळबळ उडवणाऱ्या एका अनोख्या प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. लग्नाच्या अवघ्या दहा दिवस आधी होणाऱ्या सासूसोबत पळून गेलेल्या जावयाची ही घटना होती. त्यानंतर दोघे परत आले आणि पोलिसांसमोर आम्ही एकमेकांवर प्रेम करतो व एकत्र राहू इच्छितो, असे जाहीर केले होते. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून संबंधित महिलेने जावयालाही सोडून स्वतःच्या बहिणीच्या पतीसोबत पलायन केल्याचा आरोप आहे.

राहुल नावाच्या व्यक्तीने वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) कार्यालयात धाव घेत न्याय मागितला आहे. त्याचा दावा आहे की, गेल्या दहा महिन्यांपासून तो आणि अनिता नावाची महिला सीतामढी येथे पती-पत्नीप्रमाणे राहत होते. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता तो नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडला. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या जाण्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात, म्हणजे सकाळी 9 वाजता अनिता ही तिच्या बहिणीचा पती देवेंद्रसोबत घरातून निघून गेली.

राहुलचा आरोप आहे की, अनीता दोन लाख रुपये रोख, एक सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन अंगठ्या घेऊन पळून गेली. तसेच तिने त्याला फसवण्यासाठी तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचा गंभीर आरोपही त्याने केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, अनीताने त्याला तावीज घालायला भाग पाडले आणि मानसिकदृष्ट्या आपल्या प्रभावाखाली ठेवले. हा सगळा प्रकार आयुष्याची कमाई आणि मौल्यवान वस्तू हडप करण्यासाठी रचल्याचा दावा राहुलने केला आहे.

हेही वाचा : नागपूर : पबमध्ये तुफान राडा, दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी; ‘व्हॅलेंटाईन डे'च्या सेलीब्रेशनवेळी घडला प्रकार VIDEO

हे वाचलं का?

    follow whatsapp