नागपूर : पबमध्ये तुफान राडा, दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी; ‘व्हॅलेंटाईन डे'च्या सेलीब्रेशनवेळी घडला प्रकार VIDEO
Nagpur Crime News :14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘रास्ता’ पबमध्ये विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पार्टीदरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली; मात्र काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील युवकांनी एकमेकांवर हल्ला चढवत जोरदार मारामारी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नागपूर : पबमध्ये तुफान राडा, दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी
‘व्हॅलेंटाईन डे'च्या सेलीब्रेशनवेळी घडला प्रकार VIDEO
Nagpur Crime News : नागपूरमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या सेलिब्रेशनदरम्यान पबमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीची घटना समोर आली आहे. शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ‘रास्ता’ नावाच्या पबमध्ये ही घटना घडली. या झटापटीत अनेक युवक जखमी झाले असून एका युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘रास्ता’ पबमध्ये विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पार्टीदरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली; मात्र काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील युवकांनी एकमेकांवर हल्ला चढवत जोरदार मारामारी केली.
या झटापटीदरम्यान एका युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय काही अन्य युवकही किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पबमधील गोंधळामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा : 'व्हॅलेंटाइन डे'ला होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद... IIT मध्ये कार्यरत असलेल्या महिला टेक्निशिअनने संपवलं आयुष्य










