महिलेचा दीरावर जीव जडला! पतीचा काटा काढण्यासाठी लाखाची सुपारी; कुऱ्हाडीने वार करुन संपवलं
Crime News Marathi : माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी मांगन पिपरा गावात 32 वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर वार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा खून वैयक्तिक वादातून झाला असावा, असा अंदाज होता; मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि स्थानिक चौकशीच्या आधारे तपासाची दिशा बदलली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेचा दीरावर जीव जडला!
पतीचा काटा काढण्यासाठी लाखाची सुपारी;
कुऱ्हाडीने वार करुन संपवलं
Crime News Marathi : झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील महागामा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीये. महिलेने तिच्या दीरासोबतचे प्रेम संबंध टिकवण्यासाठी पत्नीचा काटा काढल्याची घटना घडलीये. दीरासोबत संगनमत करून महिलेने सुपारी देऊन पतीचा खून घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मृताचा भाऊ रोहित मोदी हा सध्या फरार आहे.
माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी मांगन पिपरा गावात 32 वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर वार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा खून वैयक्तिक वादातून झाला असावा, असा अंदाज होता; मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि स्थानिक चौकशीच्या आधारे तपासाची दिशा बदलली.
उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर आझाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची पत्नी सोनी देवी (30) हिचे तिच्या दीर रोहित मोदी याच्यासोबत गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांना विवाह करायचा होता. मात्र पती अडथळा ठरत असल्याने त्याला मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
हेही वाचा : मुंबईतील मुलुंड मेट्रोचा निर्माणाधीन स्लॅब कोसळला, पोलिसांची धडाकेबाज कारवाई, पाच जणांना पोलीस कस्टडी










