Gold Rate today : सोन्याचे पुन्हा भाव घसरले; एक तोळ्यासाठी किती हजार?
Gold price today in Mumbai : अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या भीतीने सोने-चांदीच्या दरात घसरण होत आहे. आज (बुधवारी 7 ऑगस्ट) सोन्याचे दर आणखी कमी झाले असून, 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीही कमी झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सोन्याचे भाव पुन्हा घसरले
एक तोळ्यासाठी किती हजार?
तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर पाहा...
Gold price today in Mumbai : अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या भीतीने सोने-चांदीच्या दरात घसरण होत आहे. आज (बुधवारी 7 ऑगस्ट) सोन्याचे दर आणखी कमी झाले असून, 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. अमेरिकेतील आर्थिक घडामोडींचे परिणाम सोने-चांदी किंमतीवरही झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले आहेत. चला तर मग, आजचे सोन्याचे भाव काय आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (why gold rate collapsed again what is todays 7th august gold rate in mumbai for 10 gram)
ADVERTISEMENT
गुड रिटर्न्स या वेबसाइटने सोने-चांदीचे आजचे दर प्रसिद्ध केले आहेत. मुंबईत 1 तोळे (10 ग्रॅम) 24 कॅरेट सोन्याची किंमत आज (7 ऑगस्ट) 69,270 रूपये आहे. तर, 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,500 रूपये आहे. त्याचबरोबर, चांदी 82,000 रूपये प्रति किलोने विकली जात आहे. मंगळवारी (6 ऑगस्ट) ट्रेडमध्ये चांदीची किंमत 87,500 रूपये प्रति किलो होती. चांदीच्या या किंमती पाहता एका दिवसात 5,500 रूपये किलोंनी यामध्ये घट झाल्याचे दिसत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या किंमती भारतात बदलतात.
हेही वाचा : Uddhav Thackeray CJI : "सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याच्या जागी बसून बघावं"
तुमच्या शहरातील सोन्याचे दर पाहा...
मुंबई
- 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,270 प्रति 10 ग्रॅम आहे.
- 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63,500 रुपये आहे.
पुणे
- 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,270 प्रति 10 ग्रॅम आहे.
- 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63,500 रुपये आहे.
नागपूर
- 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,270 प्रति 10 ग्रॅम आहे.
- 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63,500 रुपये आहे.
नाशिक
- 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,300 प्रति 10 ग्रॅम आहे.
- 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63,530 रुपये आहे.
हेही वाचा : Vinesh Phogat Disqualified : पॅरिस ऑलम्पिकमध्ये विनेश अपात्र कशी ठरली?
माहितीनुसार, ज्वेलर्स आणि किरकोळ खरेदीदारांकडून मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव घसरले आहे. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकेची मागणी आणि कमी व्याजदर ही सोन्याच्या स्वस्ताईसाठी चांगले संकेत ठरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 440 रुपयांनी घसरले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दरही 400 रुपयांनी घसरले आहेत. 22 कॅरेट सोनं प्रतितोळा 63,500 रुपये इतके आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे वाचलं का?
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Uddhav Thackeray : दिल्लीत तीन दिवस मुक्काम कशासाठी? ठाकरे अखेर बोलले
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT