Uddhav Thackeray : दिल्लीत तीन दिवस मुक्काम कशासाठी? ठाकरे अखेर बोलले 

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेससह इतर पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या.
उद्धव ठाकरे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंची दिल्लीत पत्रकार परिषद

point

बांगलादेशातील हिंदूंबद्दल ठाकरेंनी मांडली भूमिका

point

धारावीबद्दल शरद पवारांच्या भूमिकेवरही भाष्य

Uddhav Thackeray News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर ठाकरेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. ठाकरेंच्या या दौऱ्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू असून, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिल्ली दौऱ्याचे कारण स्पष्ट केले. (Uddhav Thackeray in Delhi latest update)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांची दिल्ली दौऱ्यात पत्रकार परिषद झाली. या वेळी ठाकरे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीत आलो नव्हतो. खासदारांना घरी भेटलो होतो. दिल्लीत भेटायचे होते. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झालेली नाही. अधिवेशन सुरू असल्याने सर्व नेते इथे आहेत, त्यांना भेटणार आहे. पुढच्या रणनीतीवर चर्चा व्हायला हवी."

हेही वाचा >> माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, नाव कसं दिसणार? 

"काही दिवसात महाराष्ट्र आणि इतर दोन-तीन राज्यांच्याही निवडणुका होणार आहे. त्याही बाबतीत इंडिया आघाडी म्हणून एकसंघ पणाने लढायला पाहिजे. एकमेकांचं सहकार्य आपण कसे घेऊ शकतो, यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटले", असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

हे वाचलं का?

बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार

"बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असतील, तर ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आमच्याकडून तिकडे जाऊन काही करू अशी स्थिती नाही. अधिवेशन सुरू आहे. सर्वपक्षीय बैठक माहिती देण्यासाठी होती का? तसे असेल तर त्याला काही अर्थ नाही. केंद्राने ताबडतोब पावले उचलून हिंदूचं रक्षण केले पाहिजे", असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

शरद पवारांची धारावीबद्दल भूमिका

धारावी बाबत शरद पवारांनीही भूमिका स्पष्ट करावी अशी तुमची मागणी असेल का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, "कुणी काय भूमिका घ्यावी, त्यापेक्षा माझी भूमिका स्पष्ट आहे. मी धारावीच्या विकासाआड आलेलो नाही. धारावीकरांना तिथल्या तिथे घरे मिळाली पाहिजेत."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भारताच्या 'सुवर्ण' आशेला धक्का! विनेश ठरली अपात्र; नेमकं घडलं काय? 

"धारावीतील लोकांना अपात्र ठरवून मुंबईत एका धारावीच्या 20 धारावी तयार करण्याचा डाव मिंधे सरकार अदाणीमार्फत करत आहे. ते आम्ही होऊ देणार नाही. मुंबईची विल्हेवाट आम्ही कुणालाही लावू देणार नाही. इतरांची भूमिका काय असेल, हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना मुंबई विल्हेवाट कुणालाही लावू देणार नाही."

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT