Mazi Ladki Bahin Yojana List 2024: माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर, नाव कसं दिसणार?

मुंबई तक

Mazi Ladki Bahin Yojana List 2024: माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली असून ही यादी आता आपल्याला ऑनलाइन देखील तपासता येणार आहे.

ADVERTISEMENT

माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर
माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर

point

तुमचं नाव यादीत कसं तपासाल?

point

नाव ऑनलाइन येणार तपासता..

Mazi Ladki Bahin Yojana List: मुंबई: माझी लाडकी बहीण योजनेची यादी महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे अशा सर्व महिला ऑनलाइन नारी शक्ती दूत ॲपद्वारे माझी लाडकी बहीण योजना यादीमध्ये त्यांची नावे तपासू शकतात. राज्यातील ज्या महिलांची नावे या यादीत असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाइल फोनच्या मदतीने या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल.

माझी लाडकी बहीण योजना नेमकी आहे तरी काय?

महाराष्ट्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. जेणेकरून महिलांची आर्थिक स्थिती सुधारता येईल. राज्य सरकारकडून देण्यात येणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पाठवली जाईल. जेणेकरून त्यांना कोणत्याही आर्थिक समस्यांशिवाय त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतील आणि त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि पोषण यावर लक्ष केंद्रीत करता येईल.

हे ही वाचा>> Mukhyamantri Annapurna Yojana : महिलांनो...तरच वर्षाला तीन सिलिंडर मिळणार मोफत, कारण...

महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर केली आहे. या यादीत ज्या महिलांची नावे असतील त्यांना योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांच्या आर्थिक प्रोत्साहन रकमेचा लाभ मिळणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp