Mukhyamantri Annapurna Yojana : महिलांनो...तरच वर्षाला तीन सिलिंडर मिळणार मोफत, कारण...
Mukhyamantri Annapurna Yojana Scheme : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेसाठीचा शासन निर्णय, पात्रता, निकष याआधीच जाहीर करण्यात आले होते. मात्र या निकषात एक अट खूप महत्वाची आहे. या अटीशिवाय तुम्हाला या योजनेला लाभ मिळणे अशक्यच आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत
या निकषात एक अट खूप महत्वाची आहे.
या अटीशिवाय योजनेला लाभ मिळणे अशक्यच
Mukhyamantri Annapurna Yojana Scheme : राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेसोबत (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत (Cylinder Free) दिले जाणार आहेत. या योजनेसाठीचा शासन निर्णय, पात्रता, निकष याआधीच जाहीर करण्यात आले होते. मात्र या निकषात एक अट खूप महत्वाची आहे. या अटीशिवाय तुम्हाला या योजनेला लाभ मिळणे अशक्यच आहे. ही अट नेमकी कोणती आहे? हे जाणून घेऊयात. (mukhyamantri annapurna yojana scheme which families will get 3 cylinders free this condition is more important)
सद्यस्थितीत अनेक कुटुंबात गॅसचे कनेक्शन हे घरातील मुख्य व्यक्तीच्या नावावर असते. क्वचितच अशी कुटुंब आहेत, ज्यामध्ये महिलांच्या नावावर कनेक्शन असतात. त्यामुळे महिलांना यो योजनेचा लाभ न मिळवून देणारी ही सर्वात मोठी अडचण असू शकते. त्यामुळे यो योजनेच्या पहिल्याच पात्रता निकषात स्पष्टच सांगितलं आहे. जर गॅस जोडणी ही महिलांच्या नावावर असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या नावावर गॅस जोडणी नसेल त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल, पैसे मिळणार की नाही?
केंद्राच्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या दोन्ही योजनांमध्ये समावेश नसलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नसणार आहे. त्यामुळे महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पात्रता काय?
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
सद्यःस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत पात्र असलेले सुमारे 52 लाख 16 हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल.
ADVERTISEMENT
एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल.
योजनेचा लाभ फक्त 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे.
किती पैसे मिळणार?
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यामार्फत केले जाते. मु्ख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडरचे वाटपही तेल कंपन्यामार्फत केले जाईल.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदाना व्यतिरिक्त राज्य सरकार 530 रुपये प्रति सिलेंडर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
हे ही वाचा : Maharashtra Vidhan Sabha : अजित पवारांच्या आमदाराचा राजकीय संन्यास, वारसदारही ठरला!
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 830 रुपये किंवा जिल्ह्यानिहाय सिलेंडरच्या दरानुसार पैसे दिले जाणार आहेत.
ADVERTISEMENT