शाळेत जाताना आठवीच्या विद्यार्थिनीचा बलात्कार करुन खून, प्रशासनानं कुटुंबियांना दिलं नोकरीचं आश्वासन; नेमकं काय घडलं?
Crime News : मुलींचं शिकणंच नव्हे तर त्यांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. शाळेत निघालेल्या एका 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केली आहे. आठवीची परीक्षाव देण्यासाठी ती घराबाहेर पडली होती. मात्र ती परीक्षा केंद्रावर पोहोचू शकली नाही. यानंतर शोधाशोध केली असता तिचा अर्धवट विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शाळेत जाताना आठवीच्या विद्यार्थिनीचा बलात्कार करुन खून
प्रशासनानं कुटुंबियांना दिलं नोकरीचं आश्वासन
नेमकं काय घडलं?
Crime News : मुलगी शिकली, प्रगती झाली असं एक विधान आपण सतत ऐकत असतो. मात्र त्यांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. मुलींचं शिकणंच नव्हे तर त्यांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. शाळेत निघालेल्या एका 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केली आहे. आठवीची परीक्षाव देण्यासाठी ती घराबाहेर पडली होती. मात्र ती परीक्षा केंद्रावर पोहोचू शकली नाही. यानंतर शोधाशोध केली असता तिचा अर्धवट विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आरोपी श्याम सुंदर याला अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील ही हृदयद्रावक घटना आहे.
हे ही वाचा : 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 70 वर्षीय नराधमानंही गय केली नाही; मुलगी गरोदर राहिल्यानंतर सगळा प्रकार समोर
बलात्कार केल्याचा संशय
तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपी श्याम सुंदरला ताब्यात घेतले असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला रस्त्यात एकटे गाठून अडवले होते. जेव्हा तिने प्रतिकार केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिची गळा आवळून हत्या केली. मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडल्याने बलात्कार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच यावर अधिक स्पष्टता येईल असे पोलिसांनी सांगितले.
पोस्ट मार्टम करण्यास नकार
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. दोषींना अटक करेपर्यंत मृतदेहाचे पोस्ट मार्टम करण्यास कुटुंबीयांनी नकार दिला होता. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापले असून माजी मंत्री देवी सिंह भाटी, भंवर सिंह भाटी आणि इतर नेत्यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एडीजी लता मनोज यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली होती.










