मुलांच्या हॉस्टेलमध्ये टिफिन घेऊन गेलेल्या मुलीसोबत काय घडलं?

मुंबई तक

Varanasi nursing student death: तिने स्वतःच्या हाताने जेवण बनवून मोठ्या उत्साहाने टिफिन पॅक केला आणि ती एका मुलांच्या हॉस्टेलकडे जाण्यासाठी निघाली. मात्र, घराबाहेर हसत-खेळत निघालेल्या या मुलीचा मृतदेह दोन तासांनंतर त्याच हॉस्टेलच्या पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्यात सापडला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुलांच्या हॉस्टेलमध्ये टिफिन घेऊन गेली

point

अन् घडलं भयानक

Varanasi nursing student death: वाराणसीतील सारनाथ भागात एका 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी (10 जून) ही विद्यार्थिनी घरात अतिशय आनंदी होती. तिने स्वतःच्या हाताने जेवण बनवून मोठ्या उत्साहाने टिफिन पॅक केला आणि ती सारनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका मुलांच्या हॉस्टेलकडे जाण्यासाठी निघाली. मात्र, घराबाहेर हसती-खेळती निघालेल्या या मुलीचा मृतदेह दोन तासांनंतर त्याच हॉस्टेलच्या पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने अनेक खळबळजनक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, तिच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आल्याने या मृत्यूमागे घातपाताचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

तिने टिफिन कोणासाठी नेला?

मृत विद्यार्थिनी जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरीची (GNM) शिक्षण घेत होती आणि सारनाथ पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या सरकारी निवासी क्वार्टरमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होती. पोलीस तपासातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते 'दोन तास', जे तिने त्या बॉयज हॉस्टेलमध्ये घालवले. ती तिथे कोणाला भेटायला गेली होती आणि तिने आणलेला टिफिन कोणासाठी होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. हॉस्टेलमधून बाहेर पडताना किंवा खोलीतून बाहेर आल्यानंतर ती अचानक पायऱ्यांवर बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. ही घटना उघडकीस येताच हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हे ही वाचा : जालना: सावत्र बापाचं अमानुष कृत्य, पैशांच्या वादातून चिमुरड्याचे हात पाय बांधून..

दोन तास कुणाच्या खोलीत?

तपासादरम्यान पोलीस आणि फॉरेन्सिक टीमला विद्यार्थिनीच्या मृतदेहाजवळ काही संशयास्पद औषधे सापडली आहेत. या औषधांचा संबंध तिच्या गुप्तांगातून होणाऱ्या रक्तस्त्रावाशी किंवा तिच्या मृत्यूशी असू शकतो, असा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे. जप्त केलेल्या औषधांचे रॅपर्स प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हॉस्टेलच्या वॉर्डनला आणि काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ती दोन तास नेमकी कोणत्या मुलाच्या खोलीत होती आणि त्या दरम्यान तिथे नक्की काय घडले, हे शोधणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

हे ही वाचा : NEET ची तयारी करणाऱ्या गर्लफ्रेंडला पुलावर घेऊन गेला अन्..., बॉयफ्रेंडने काय केलं?

पोलिसांनी काय सांगितले?

या प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थिनीचा मोबाईल फोन जप्त केला असून तिचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सॲप चॅट्स तपासले जात आहेत. घटनेच्या दिवशी तिला कोणी फोन करून बोलावले होते का, याची माहिती यातून समोर येण्याची शक्यता आहे. तसेच, हॉस्टेलच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून, ती कोणासोबत आली होती की एकटीच होती, हे स्पष्ट होईल. पोलिसांनी हा प्रकार हत्या, आत्महत्या की एखादा गंभीर कट या सर्व बाजूंनी तपासण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे करण्यात येणाऱ्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतरच दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.
 

हे वाचलं का?