नवरा-बायकोचा फोनवरून वाद, महिलेनं वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून..

मुंबई तक

Crime News : जीएल बजाज कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या एका महिलेनं वसतिगृहाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं. या घटनेनं विद्यालयातील परिसर हादरून गेला. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळपणे घटनास्थळी धाव घेत, मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

बायको फोनवर बोलत असल्याने पतीसोबत वाद 

point

महिलेनं वसतिगृहावरून उडी मारत संपवलं जीवन

Crime News : दिल्ली- एनसीआरमधील ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क कोतवाली परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जीएल बजाज कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या एका महिलेनं वसतिगृहाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं. या घटनेनं विद्यालयातील परिसर हादरून गेला. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळपणे घटनास्थळी धाव घेत, मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. 

हे ही वाचा : प्रणित मोरेच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबाबत भलतंच बोलणारी डॉ. सेजल पवार आहे तरी कोण?

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेची पारूल चौधरी अशी ओळख पटली. पारूल ही मेरठ जिल्ह्यातील बहसुमा पोलीस ठाणे परिसरातील एका गावत राहत होती. ती ग्रेटन नोएडाच्या जीएल बजाज कॉलेजमधील मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून, अशी माहिती समोर आली की, पारूलने सुमारे आठ महिन्यांपूर्वी सौरभसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर हे नवविवाहित जोडपे ग्रेटर नोएडाच्या सूरजपूर भागातील एका भाडेतत्त्वाच्या खोलीत एकत्र राहत होते. 

बायको फोनवर बोलत असल्याने पतीसोबत वाद 

ग्रेटर नोएडाच्या अतिरिक्त डीसीपी संतोष कुमार यांनी सांगितलं की, पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले की, पारूल ही शुक्रवारी रात्री तिच्या मोबाईल फोनवर बोलत होती. नवऱ्याचा तिच्यासोबत फोनवर यावरून वाद झाला. शनिवारी सकाळी, पारूल तिच्या नेहमीच्या कामासाठी वसतिगृहात पोहोचली. मानसिक ताण तणावामुळे तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं.  

महिलेनं वसतिगृहावरून उडी मारत संपवलं जीवन

पारूलने उडी मारल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. कोणताही वेळ न दवडता व्यवस्थापनेने तात्काळपणे पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचं पाहून पारूलला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

हे वाचलं का?