प्रणित मोरेच्या शोमध्ये मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबाबत भलतंच बोलणारी डॉ. सेजल पवार आहे तरी कोण?

मुंबई तक

स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये डॉ. सेजल पवार आली होती. यावेळी सेजल पवार हिने केलेल्या असभ्य टिप्पणीमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. जाणून घ्या कोण आहे सेजल पवार.

ADVERTISEMENT

who exactly is dr sejal pawar who made highly inappropriate remarks about a dead bodys private parts on pranit more show
सेजल पवार
google news

Who is Sejal Pawar: मुंबई: स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे डॉ. सेजल पवार हे नाव सध्या राज्यभर चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक माध्यमे आणि राजकीय वर्तुळात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

कोण आहे डॉ. सेजल पवार?

डॉ. सेजल पवार ही मुंबईतील KEM Hospital येथे शिक्षण घेणारी एमबीबीएसची विद्यार्थिनी आहे. काही वृत्तांनुसार ती अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी असून वैद्यकीय शिक्षण घेत असताना प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी झाली होती. 

नेमका वाद काय आहे?

प्रणित मोरेच्या 'क्राउड वर्क' स्वरूपाच्या शोमध्ये प्रेक्षकांशी संवाद साधताना सेजल पवारने वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहांबाबत आणि त्यांच्या खासगी अवयवांबाबत एक अत्यंत वादग्रस्त टिप्पणी केली होती. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली. अनेक डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हे वक्तव्य शरीरदान करणाऱ्या व्यक्तींचा व वैद्यकीय नैतिकतेचा अपमान असल्याचे म्हटले.

हे ही वाचा>> 'आम्ही मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबाबत...' प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बोलली, डॉ. सेजल पवारबाबत KEM चा मोठा निर्णय

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर सेजल पवारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी "कॅडव्हर हे वैद्यकीय विद्यार्थ्यांचे पहिले शिक्षक असतात" असे सांगत या वक्तव्याचा निषेध केला. All India Medical Students' Association या संघटनेनेही या वक्तव्यावर आक्षेप घेत तो वैद्यकीय शिक्षणाच्या पवित्रतेला धक्का देणारा असल्याचे म्हटले. 

हे वाचलं का?