भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात, 5 जवानांचा मृत्यू

मुंबई तक

भारतीय हवाई दलाचे 'एएन-32' (AN-32) या विमानाचा लँडिंग करत असताना भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात हवाई दलाच्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

IAF aircraft crash
IAF aircraft crash
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात

point

5 जवानांचा मृत्यू

IAF aircraft crash : आसाममधील जोरहाट हवाई दलाच्या तळावर शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. भारतीय हवाई दलाचे 'एएन-32' (AN-32) या मालवाहू विमानाचा लँडिंग करत असताना भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात हवाई दलाच्या पाच जवानांचा मृत्यू झाला आहे, तर विमानाचे सह-पायलट या अपघातातून सुखरूप बचावले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

का घडला अपघात?

प्राथमिक माहितीनुसार, जोरहाट हवाई दलाच्या तळावर उतरल्यानंतर विमानाने अचानक पेट घेतला. विमानाला आग लागल्याचे समजताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. अपघात घडल्याचे समजताच भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक त्या आपत्कालीन उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा : पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, पतीने सोशल मीडियावर 'तसले' व्हिडीओ टाकले

पाच जवानांचा मृत्यू

हवाई दलाने अधिकृत निवेदन जारी करून या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृत्यू झालेल्या जवानांमध्ये स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांचा समावेश आहे. हवाई दलाने या शूर जवानांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, या कठीण प्रसंगात हवाई दल शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

हे ही वाचा : एक 26 वर्षीय कबड्डीपटू अन् 25 हल्लेखोर, कुणी कुणाला संपवलं?

कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश

या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. विमानाला आग कशी लागली आणि अपघात कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे (उच्चस्तरीय चौकशी) आदेश दिले आहेत. या चौकशीचा अहवाल आल्यानंतरच दुर्घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले असून सध्यातरी या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
 

हे वाचलं का?