Maharashtra Weather : राज्यात 'या' भागांत पाऊस, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट
Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून उष्णता आणि पावसाचा दुहेरी प्रभाव कायम असून हवामान विभागाने विविध भागांसाठी वेगवेगळा अलर्ट वर्तवण्यात आला आहे. राज्यातील जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती
राज्यात दुहेरी हवामानाचा प्रभाव
Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून उष्णता आणि पावसाचा दुहेरी प्रभाव कायम असून हवामान विभागाने विविध भागांसाठी वेगवेगळा अलर्ट वर्तवण्यात आला आहे. राज्यातील जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. अशातच जाणून घेऊयात 13 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.
हे ही वाचा : गुंगीच्या पाच गोळ्या देत शेतात नेलं, 9-10 वर्षाच्या मुलीवर नको तेच..
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. याच भागातील तापमान हे सरासरी राहण्याची अधिक शक्यता आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना कोणताही अधिकृतपणे अलर्ट वर्तवलेला नाही, मात्र तरीही या जिल्ह्यांना हलका ते मध्यम स्वरुपाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत कोणाताही अलर्ट वर्तवला नसला तरीही ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणाहून वादळी वारे वाहू शकतात.









