'मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरून आम्ही..', प्रणित मोरेसमोर काहीही बरळणाऱ्या सेजल पवारवर KEM कडून 'ही' मोठी कारवाई
Dr Sejal Pawar : केईएम रुग्णालयातील विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला असून तिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टबाबत टिप्पणी करणाऱ्या सेजल पवारला झटका
KEM ची मोठी कारवाई
Dr Sejal Pawar, Mumbai KEM Hospital : मुंबईतील प्रतिष्ठित केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिने एका यूट्यूब चॅनलवर केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. कंटेंट क्रिएटर प्रणित मोरे याच्या शोमध्ये सहभागी झालेल्या सेजल पवार हिने मृतदेहांच्या संदर्भात, विशेषतः पुरुष मृतदेहांच्या शारीरिक अवयवांबद्दल अतिशय आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वैद्यकीय क्षेत्रासह सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. एका डॉक्टरकडून अशा प्रकारच्या संवेदनशील विषयावर केली गेलेली ही थट्टा वैद्यकीय नियमावली आणि नैतिकतेच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा : धाराशिव : सरकारी कर्मचाऱ्याला 'लुटेरी दुल्हन'ने 27 लाखांना लुटले, कसं टाकलं जाळं?
सेजल पवार 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर, KEM कडून कारवाई
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केईएम महाविद्यालय प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. प्राथमिक तपासणीत व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती ही डॉ. सेजल पवारच असल्याचे निष्पन्न झाले असून, तिने केलेली विधाने प्रथमदर्शनी आक्षेपार्ह आणि पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. यावर कठोर कारवाई करत प्रशासनाने सेजल पवार हिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर (forced leave) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत तिला महाविद्यालय, रुग्णालय परिसर आणि वसतिगृहात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच ती कोणत्याही शैक्षणिक किंवा इतर महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
हेही वाचा : राजघराण्यातील सवतींमध्ये वाद, एकीने रायफल काढली अन्...; धक्कादायक प्रकरण









