वसई : 'करिअर घडवून देतो', फुटबॉल कोचचा 17 वर्षीय मुलीवर बलात्कार

मुंबई तक

vasai crime news : वसईमध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने एका 17 वर्षीय मुलीवर तीन वर्षे अत्याचार करणाऱ्या प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

vasai crime news
vasai crime news
google news

बातम्या हायलाइट

point

वसई : 'करिअर घडवून देतो', व्हिडीओ व्हायरलची धमकी

point

फुटबॉल कोचचा 17 वर्षीय मुलीवर बलात्कार

vasai crime news, प्रवीण नलावडे : वसई परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. फुटबॉलमध्ये करिअर घडवण्याचे स्वप्न दाखवून एका 17 वर्षीय मुलीचे शोषण करण्यात आले आहे. अभिजित मेंडल (वय 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रशिक्षकाचे नाव असून, तो वसई भागात खासगी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र चालवतो. 

हेही वाचा : मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टबाबत टिप्पणी करणाऱ्या सेजल पवारला झटका, KEM ची मोठी कारवाई

मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार 

पीडित मुलगी 2023 मध्ये प्रशिक्षणासाठी त्याच्याकडे गेली होती. प्रशिक्षकाने तिला फुटबॉल क्षेत्रात मोठी संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. तीन वर्षांच्या कालावधीत त्याने मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची गंभीर तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुलीला बॉयफ्रेंडसोबत रहायचं होतं, वडिलांनी काय केलं बघा...

हे वाचलं का?