'आम्ही मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबाबत...' प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बोलली, डॉ. सेजल पवारबाबत KEM चा मोठा निर्णय
डॉ. सेजल पवार हिने प्रणित मोरेच्या शोमध्ये केलेलं विधान हे आता तिला प्रचंड अडचणीत आणणारं ठरलं आहे. कारण केईएम कॉलेज प्रशासनाने तिच्याविरोधात चौकशी समिती स्थापन केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईतील केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिच्या एका यूट्यूब चॅनलवरील वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर प्रणित मोरेच्या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर KEM रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर केईएम प्रशासनाने अंतर्गत चौकशीचे आदेश दिले असून दोन प्राध्यापकांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीकडून चौकशी अहवाल उद्या सायंकाळपर्यंत सादर केला जाण्याची अपेक्षा आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रणित मोरे यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणादरम्यान शवविच्छेदन विभागात येणाऱ्या मृतदेहांबाबत आणि पुरुष मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टबाबत टिप्पणी केली होती. या वक्तव्याचा एक भाग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
हे ही वाचा>> बीड : तलाठ्याच्या बायकोचे अनैतिक संबंध, लग्नाच्या 12 दिवसानंतर आयुष्याचा शेवट
व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित संवेदनशील विषयांवर अशा प्रकारे सार्वजनिक मंचावर बोलणे योग्य आहे का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. काही सोशल मीडिया यूजर्संनी या वक्तव्याला असंवेदनशील म्हटले, तर काहींनी ते वैद्यकीय शिक्षणातील अनुभवाच्या संदर्भात पाहण्याची भूमिका घेतली.









