Maharashtra Weather : राज्यावर दुहेरी संकट, कुठे ऊन, तर कुठे पावसाचा यलो अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, अशातच राज्यातील काही ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  तसेच कोकणातील सर्वच जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट वर्तवलेला आहे, अशातच जाणून घेऊयात 15 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे..

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती

point

काही ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, अशातच राज्यातील काही ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  तसेच कोकणातील सर्वच जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट वर्तवलेला आहे, अशातच जाणून घेऊयात 15 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : राला रंगकाम करण्यासाठी आले, महिलेला एकटं पाहून नको तेच अन्..

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत हवामान उष्ण राहणार आहे. तसेच दुपारनंतर हलक्या पावसाचा अंदाज आहे. याच विभागाला यलो अलर्टचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

धुळे या जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच नंदूरबार, जळगाव या दोन जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांत हलका पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवलेली आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ; तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. याच जिल्ह्यांना पावसाचा यलो अंदाज वर्तवण्यात आला.  

हे वाचलं का?