तरुणाकडून अभिजीत दीपकेला मारहाण, Video व्हायरल
abhijit dipke : कॉक्रोच जनता पार्टीने दिल्ली आणि पुण्यात सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. मात्र आता त्याच्यावर हल्ला करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गोंधळात अभिजीतच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणाने अभिजीत दीपकेच्या कानशीलात लगावली
पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं
Abhijit Dipke : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानच्या जयपूर येथे ही घटना घडल्याची माहिती समोर आली. NEET पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेविरोधात त्यानं आणि कॉक्रोच जनता पार्टीने दिल्ली आणि पुण्यात सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. मात्र आता त्याच्यावर हल्ला करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गोंधळात अभिजीतच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : स्पा सेंटरच्या बंद दाराआड वेश्याव्यवसायाचं रॅकेट, आरोपींवर कारवाई अन्..
तरुणाने अभिजीत दीपकेच्या कानशीलात लगावली
अभिजीत दीपके आणि कॉक्रोच जनता पार्टीने NEET घोटाळा प्रकरणी सुरूवातीला दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलन केलं. त्यानंतर पुण्यात देखील याच मुद्द्यावरून आंदोलन केलं. आज त्यांनी जयपूर येथे आंदोलन केलं असून अभिजीत दीपके हा आंदोलनस्थळी दाखल झाला असता, गर्दीतील एका तरुणाने त्याच्या कानशीलात लगावली.
पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं
नंतर त्याला सातत्याने मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या युवकाला तातडीने ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले.
हे ही वाचा : 19 वर्षीय मुलीला बापानेच कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं, बायको वाचवायला गेली अन्..
या घटनेनंतर अभिजीत दीपकेनं आंदोलकांना संबोधित केलं की, हिंदू मुस्लिम हे राजकारण करून देणार नाही, चालणार नाही. हे स्वातंत्र्य बलिदानावर मिळवले गेले होते. आपण हिंदू-मुस्लिम यांच्यात विभागले गेलो आहोत. आपण जात-धर्मांत विभागलो आहोत, मात्र यामध्ये अडकून पडता कामा नये. आम्ही 20 जून रोजी पुन्हा एकदा दिल्लीवर मोर्चा काढणार असल्याचं अभिजीत दीपके म्हणाला.









