प्राथमिक शाळेत 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेला आढळला, हिमांशूची हत्या केल्याचा संशय
crime news : एका प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या स्वरुपात आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. परिस्थिती पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दारूच्या नशेतून झालेल्या भांडणातून हिमांशूच्या हत्येचा संशय
प्राथमिक शाळेच्या वरच्या मजल्यावर लटकलेला आढळला मृतदेह
Crime news : बिहारच्या दरभंगा येथील इम्लीघाट येथील पुलाजवळील एका प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या स्वरुपात आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. परिस्थिती पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह काढला.
हे ही वाचा : पुण्यातून परतलेल्या जोडप्याचा किरकोळ कारणावरून वाद; पत्नीने फाशी घेतली, पतीनेही संपवलं आयुष्य
मेहुण्याला हत्येचा संशय
मृताची ओळख पटली असून भरत मंडल उर्फ हिमांशु (वय 18) असे त्याचे नाव आहे. त्याचा मेहुणा सावन राय याने हत्येचा संशय व्यक्त केला आहे. हिमांशूची हत्या करून हत्येचा संशय न येण्यासाठी त्याचा मृतदेह लटकवण्यात आला असा आरोप आहे. त्याने सांगितलं की, तो मित्रांसोबत घरातून बाहेर पडला असता, पुन्हा घरी परतलाच नाही. शोध घेऊनही याबाबतची माहिती समोर आली नाही.
दारूच्या नशेतून झालेल्या भांडणातून हिमांशूच्या हत्येचा संशय
स्थानिकांचे म्हणणे आहे की, संबंधित शाळेच्या परिसरात अनेक व्यसनी लोक एकत्र यायचे. दारूच्या नशेतून झालेल्या भांडणातून हिमांशूची हत्या करण्यात आली असावी आणि मृतेदह शाळेच्या वरच्या मजल्यावर लटकवण्यात आला असावा. याबाबत पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढण्यास नकार दिला. दरम्यान, मृत व्यक्ती हा इलेक्ट्रिकल डेकोरेटर म्हणून काम करतो.
हे ही वाचा : प्रेमप्रकरणातून तरुणाने रस्त्याच्या मधोमध स्कार्फने गळफास घेतला, मृतदेह मांडीवर घेऊन तरुणी ढसाढसा रडली
शहर पोलिसांनी घटनास्थळ सील करून तपासासाठी एफएसएल पथकाला पाचारण केले. पोलिसांसह पथकाने घटनास्थळावरून काही वस्तू गोळा केल्या. शवविच्छेदन अहवालातून तपासानंतर घटनेचे खरे कारण अद्याप समोर आले नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे.










