Vinesh Phogat Disqualified : पॅरिस ऑलम्पिकमध्ये विनेश अपात्र कशी ठरली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

कुस्तीपटू विनेश फोगाट.
कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत अपात्र ठरली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विनेश फोगाट पॅरिस ऑलम्पिकच्या अंतिम फेरीआधी अपात्र

point

विनेश फोगाटचे रौप्य पदकही गेले

point

वजन जास्त भरल्याने ठरली अपात्र

Vinesh Phogat Paris Olympic : पॅरिस ओलम्पिक 2024 स्पर्धेत भारताला जबर धक्का बसला. विनेश फोगाटला पॅरिस ऑलम्पिकमध्ये अपात्र घोषित करण्यात आले आहे. ती 50 किलो वजनी कुस्ती गटातून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती. विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा जास्त आढळून आले. विनेशला सुवर्ण पदक जिंकण्याची संधी होती. अपात्र ठरल्यामुळे तिचे रौप्य पदकही गेले आहे. (Why vinesh phogat Disqualified from paris olympic)

29 वर्षीय विनेश फोगाट कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात अपात्र ठरली. तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरले. विनेश फोगाटचे वजन जास्त आढळून आले. तिने ते कमी करण्याचा प्रयत्न केला पण अपयशी ठरली. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने याबद्दलची माहिती दिली आहे. 

विनेश फोगाट अपात्र, आयओएने काय सांगितलं?

इंडियन असोसिएशनने म्हटले आहे की, भारताची 50 किलो वजनी कुस्ती गटातील विनेश फोगाट अपात्र ठरल्याचे खेदाने सांगावं लागत आहे. रात्रभर टीमने प्रयत्न केले, पण सर्वोपरी प्रयत्न करूनही आज सकाळी तिचे वजन 50 किलोपेक्षा काही ग्राम अधिक आढळून आले. यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही. विनेश फोगटच्या सन्मानाचा आदर करावा अशी विनंती आहे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> बॅडमिंटन कोर्टवर रक्त सांडलं, पट्टी बांधून खेळला तरी पदकाचं स्वप्न भंगलं! 

रौप्य पदकही गेले

विनेश फोगाटने अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अंतिम सामन्यात पराभूत झाली असती, तरी तिला रौप्य पदक मिळाले असते. पण, वजनामुळे ती अपात्र ठरली. स्पर्धेतूनच अपात्र ठरल्याने विनेशचे रौप्य पदकही गेले आहे.

हेही वाचा >> "गौतम गंभीर जास्त दिवस टिकणार नाही, कारण...", माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान 

अमेरिकेच्या कुस्तीपटूसोबत होणार होता सामना

विनेश फोगाटचा अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कुस्तीपटूसोबत मुकाबला होता. क्युबाची कुस्तीपटू युसनेईलिस गुजमेनला पराभूत करून विनेश अंतिम फेरीत पोहोचली होती. तिने 5-0 ने पराभूत केले होते. अंतिम सामन्यात अमेरिकेच्या एन सारा हिल्डेब्रॉण्टसोबत तिचा मुकाबला होणार होता. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT