Mumbai Tak /गुन्ह्यांची दुनिया / पुण्यातून पाकिस्तानी तरुण ताब्यात, पोलिसांनी त्याला नेमकं कसं पकडलं?
गुन्ह्यांची दुनिया

पुण्यातून पाकिस्तानी तरुण ताब्यात, पोलिसांनी त्याला नेमकं कसं पकडलं?

Pakistani Man Living In Pune : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुणे शहरात एका पाकिस्तानी (Pakistan) तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी पुण्यातील (Pune) खडक परिसरातून या पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेतले आहे. मोहम्मद अमान अन्सारी (Mohmad Aman Ansari) असे या 22 वर्षीय पाकिस्तानी तरुणाचे नाव आहे. 8 मार्च रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Pakistani youth detained from Pune, how exactly did the police catch him?)

मोहमंद अमन अन्सारी हा गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता. इतक्या वर्षांपासून पाकिस्तानी तरुण भारतात राहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुप्तचर यंत्रणा इतकी वर्ष काय करत होती, असा सवाल देखील सवाल यावेळी उपस्थित होत आहे. तो मागील आठ वर्षांपासून वेगवेगळी कामं करत होता. कोणतेही कागदपत्रे नसताना देखील हा तरुण पुण्यातील भवानी पेठेत राहत होता. या कारवाईनंतर त्या परिसरात खळबळ उडाली आहे.

PFI संबंधित सहाव्या आरोपीला जळगावातून अटक, ATS ची कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, अन्सारी हा 2015 सालापासून पुण्यातील भवानी पेठेत बेकायदेशीरपणे राहत होता. अवैधरित्या गेल्या 8 वर्षांपासून तो इथे तो वास्तव्यास होता. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक बनावट भारतीय पासपोर्ट आढळून आला. त्याने या पासपोर्टचा वापर करून दुबईला देखील प्रवास केला होता, असं देखील यातून समोर आले आहे.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात खडक पोलिसात कलम 420, 468, 471, विदेशी व्यक्ती आधिनियम 1946 कलम 14 आणि पासपोर्ट आधिनियम 1967 कलम 12 (1A) a याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत असे नमुद केले आहे की, पोलिसांना या तरुणासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस मागील काही दिवसांपासून या तरुणाच्या मार्गावर होते. त्यात पोलिसांना तो खडक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी सापळा रचून त्याला गजाआड केलं आहे. विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

मोहंमद अमान अन्सारी 8 वर्षापासून खोटे कागदपत्राच्या आधारे पुण्यात राहत होता. नेमका हा इतकी वर्ष पुण्यात काय करत होता याचा तपास आता सुरु आहे. त्याचबरोबर त्याने बनावट भारतीय पासपोर्टच्या माध्यामाने दुबईला जावून आला होता. नेमका दुबईला का गेला होता. त्याचे कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का, यांसारखे अनेक प्रश्न यादरम्यान उपस्थित होत आहेत.

कुणी MBA तर कुणी शेतकरी, जाणून घ्या कोण आहेत दिल्ली पोलिसांनी अटक केलेले सहा संशयित दहशतवादी?

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?