Crime: डोंबिवलीत १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत काय घडलं?

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Dombivali Crime News
Dombivali Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूरपाठोपाठ डोंबिवलीतही लैंगिक अत्याचाराची घटना

point

१० वर्षीय मुलीवर लैेंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

point

मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला धक्कादायक प्रकार

Dombivali Crime News : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं संपूर्ण देशात संतापाची लाट पसरलीय. ही घटना ताजी असतनाच आता डोंबिवलीतही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संतापजन प्रकार घडला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी धर्मेंद्र यादवला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रांसोबत खेळत होती. त्यावेळी ती बालिका एका मुलासोबत घरी निघून गेली. त्यावेळी मुलाचे वडील धर्मेंद्र यादवने (आरोपी) अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीनं घरी पोहोचल्यावर तिच्या पालकांना या गंभीर प्रकाराबाबत सांगितलं. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी तातडीनं मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

हे ही वाचा >>'लग्न कधी करणार?', गावी पोहोचताच मनू भाकरनं दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय म्हणाली? 

आरोपी धर्मेंद्र यादवला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. या प्रकरणी आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. आरोपीनं आणखी कोणत्या मुलीसोबत अशा प्रकारचा घृणास्पद प्रकार केला आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Narendra Modi: "महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत फाशी आणि...", PM नरेंद्र मोदी संतापले

महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय वर्तुळातूनही या घटनांचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावमध्ये लखपती दीदी मेळाव्यात या घटनांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. "महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कडक कायदे करत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणीही त्यात छेडछाड करणार नाही, याबाबतही आम्ही निर्णय घेतला आहे. या गुन्ह्यांबाबत वेगानं तपास सुरु करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळण्यातही मदत होईल", अल्पवयीन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची नव्या कायद्यात तरतूद केली गेली आहे, असं मोदी म्हणाले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT