मित्रासोबत फिरायला गेली अन् झाला आयुष्यभर न विसरता येणारा आघात, तरुणीसोबत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Girl blackmailed and raped in Jungle
Girl blackmailed and raped in Jungle
social share
google news

Girl blackmailed and raped in Jungle : मित्र-मैत्रिणी म्हटलं की फिरण आलंच, अनेक मित्र-मैत्रीणी विकेंडला फिरायला जात असतात. अशीत एक तरूणी तिच्या मित्रासोबत जंगलात फिरायला गेली होती. मात्र असे फिरायला जाणे एका तरूणीला चांगलेच महागात पडले आहे. त्याच झालं अस की, जंगलात काही हुल्लडबाज तरूणांनी या दोन मित्र-मैत्रिणींचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून धमकी देण्यास सूरूवात केली. दोघांचे फोन हिसकावून पैशाची मागणी केली. या धमकीच्या नावाखाली तरूणांनी मित्राला पैसै आणायला पाठवत तरूणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. (a girl and her friend goes walk in the forest girl blackmail and rape rajasthan jhalawar incident)

ADVERTISEMENT

एक तरूणी आणि तिचा मित्र लोटीयाझारच्या जंगलात फिरायला गेले होते. दोघेही अनेक तास जंगलात फिरले त्यानंतर जाऊन झाडाखाली बसले होते. यावेळीच जंगलात काही हुल्लडबाज तरूणांची एन्ट्री झाली होती. या तरूणांनी त्या मित्र-मैत्रिणीचा एक व्हिडिओ बनवला आणि त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.सुरुवातीला या हुल्लडबाज तरूणांनी त्यांना त्यांचाच जंगलातला व्हिडिओ दाखवला आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसात तक्रार करू नये यासाठी या दोघांचे फोन हिसकावून घेतले होते. हुल्लडबाज तरूणांनी यानंतर दोघांकडून पैशाची मागणी केली. तरूणांनी दोघांकडून 10 हजार रूपये मागितले होते. मात्र इतकी रक्कम मित्राच्या खात्यात नव्हती.त्यामुळे त्याने घरी जाऊन आणण्याचा पर्याय दिला.

हे ही वाचा : शेजाऱ्याकडून बायको राहिली गर्भवती; पतीने केलेलं कृत्य ऐकून पोलिसही झाले सुन्न

तरूणीला धमकावून बलात्कार

यावर हुल्लडबाज तरूणांनी होकार देत एक अट घातली. तरूणाला पैसे घेण्यासाठी एकटेच जावे लागले आणि तरूणी येथेच राहिलं. तरूणांची ही अट मान्य करत मित्र पैसै आणायला घरी निघाला. यावेळी तरूणी जंगलात एकटी असल्याचा फायदा उचलत तरूणांनी तिला लाठ्या-काठ्य़ांचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. हा बलात्कार करून तरूणांनी तिला जंगलात एकटीच सोडून पळ काढला होता.या घटनेनंतर तरूणी कशीबशी पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचली. आणि तिने पोलिस ठाण्यात तरूणांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिस आरोपी तरूणांचा शोध घेतला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा :धक्कादायक!लिफ्टच्या डकमध्ये पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू,नेमकं काय घडलं? 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT