Bhiwandi sex racket : तरुणींना पैशांचं आमिष, भिवंडीत वेश्याव्यवसाय; दलाल महिलेला…
भिवंडीतील कल्याण भिवंडी रोडवर साईबाबा मंदिराजवळ एक महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती.
ADVERTISEMENT
Bhiwandi Sex Racket Busted : भिवंडीतून (Bhiwandi Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीत एक महिला सेक्स रॅकेट (Sex Racket) सर्रासपणे चालवत असल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी डमी ग्राहक (Dummy Customer) पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तरूणींना पैशांचे आमिष दाखवून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला एजंटला (Women Agent) अटक केली आहे. तसेच या महिलेकडून चार पीडीत तरूणींचीही सुटका करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात रॅकेटचा कसा पर्दाफाश केला, हे जाणून घेऊयात. (bhiwandi sex racket busted women agent arrested and four girls freed bhiwandi crime story thane)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील कल्याण भिवंडी रोडवर साईबाबा मंदिराजवळ एक महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. ही महिला काही तरूणींच्या माध्यमातून हे संपूर्ण सेक्स रॅकेट एका चाळीत चालवत होती. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी चेतना चौधरी यांनी डमी ग्राहक पाठवून घटनेचा पर्दाफाश करण्याचा प्लान आखला होता.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 : ईशान्य मुंबईतून ठाकरेंचा उमेदवार ठरला! कोण आहेत संजय पाटील?
पोलिसांनी ठरल्यानुसार पथक नेमून 27 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता कल्याण भिवंडी रोड भागात बनावट (डमी) ग्राहक पाठवला.यावेळी डमी ग्राहकाने महिला एजंटसोबत डील करायला सुरूवात केली. या डील दरम्यानच पोलिसांनी थापा टाकत महिला एजंटला अटक केली.
हे वाचलं का?
या महिला एजंट विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या आरोपी महिलेकडून चार पीडित तरूणींची सुटका करण्यात आली आहे. या चार तरूणींना उल्हासनगरच्या महिला शासकीय शांतीसदन वसतिगृहात ठेवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
हे ही वाचा : Crime : पाणीपुरी खाताना हसली म्हणून वहिनीने घेतला जीव! ठाण्यातील धक्कादायक घटना
दरम्यान याआधी भिवंडी कल्याण रोड या परिसरातील शेर ए पंजाब लॉजवर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने छापा टाकून कारवाई केली होती. 2020 ऑक्टोबरची ही घटना आहे. या घटनेत दोन दलालांवर कठोर कारवाई करत त्यांच्या तावडीतून तीन तरूणींची सुटका करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT