Crime : पाणीपुरी खाताना हसली म्हणून वहिनीने घेतला जीव! ठाण्यातील धक्कादायक घटना

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

thane crime news three women killed a one women public toilet kalwa thane crime
thane crime news three women killed a one women public toilet kalwa thane crime
social share
google news

Thane Crime News : ठाण्याच्या कळव्यातून (Kalwa) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तीन महिलांनी मिळून एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत महिलेचा (Women Beaten) दुदैवी मृत्यू झाला आहे. मुक्ता कलशे असे या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेला मारहाण करणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून तिचीच वहिनी आहे. या वहिनीने तिच्या दोन बहिणींसह मिळून मुक्ताची हत्या केली आहे. दरम्यान ही हत्या का करण्यात आली आहे, हे जाणून घेऊयात. (thane crime news three women killed a one women public toilet kalwa thane crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मृत महिला मुक्ता कलशे तिची आई आणि भाऊ सचिनसह कळव्याच्या जय भीम नगरमध्ये राहतात. तर आरोपी वहिनी रेणूकाचा विवाह मुक्ताचा भाऊ राहुलसोबत झाला होता. पण दोन वर्षापुर्वीच राहुलचे निधन झाले होते. राहुलच्या या निधनानंतर रेणूकाने त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरूणासोबत लग्न केले होते. या लग्नानंतर रेणूकाचे कलशे कुटुंबियांशी असलेले संबंध तुटले होते.

हे ही वाचा : Prithviraj Chavan : “राष्ट्रवादीने सरकार पाडले नसते, तर मराठा आरक्षणाचा…”

दरम्यान आता मुक्ताची बहिण दिवाळीला तिच्या सासरी आली होती. यावेळी दोन्ही बहिणी त्याच्या परिसरात 23 नोव्हेंबरला पाणीपुरी खात होत्या. या दरम्यान मुक्ता आणि तिची बहिण आपआपसात बोलत असताना हसत होत्या. त्याच्या या हसण्याच्या दरम्यान रेणूका त्याच रस्त्याने जात होती. त्यामुळे रेणूकाला मुक्ता आणि तिची बहिण तिलाच बघून असल्याचे वाटले. यातून त्यांच्यात वाद झाला. या वादात मुक्ताने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने रेणूकाने मुक्ताला जीवे मारण्याची धमकी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता पब्लिक टॉयलेटला गेली होती. याचवेळी रेणूका तिच्या अंजना आणि लक्ष्मी या दोन बहिणींसह घटनास्थळी दाखल झाली. यावेळी तिन्ही बहिणींनी मिळून मुक्ताला लाथा-बुक्यांनी मारहाण केली. लक्ष्मीने मुक्ताची केस ओढून तिचे डोकं जमीनीवर आपटलं. या सर्व घटनाक्रमा दरम्यान मुक्ताची आई घटनास्थळी दाखल झाली होती. यावेळी तीनही बहिणींनी मिळून तिला देखील मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही मायलेकी गंभीर जखमी झाल्या होत्या.

हे ही वाचा : Dharmveer 2 : ‘सिनेमा आवडो न आवडो आता…’,CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

या सर्व घटनेनंतर मुक्ताने या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तीनही महिलांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच मुक्ताला कळवानजीक छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आता कळवा पोलिसांनी रेणूका बोंद्रे, अंजना रायपुरे आणि लक्ष्मी गाडगेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT