Crime : भाच्याचा मामीवर जडला जीव, मामाला कळताच...; अनैतिक संबंधातून घडलं भयानक हत्याकांड
Rajasthan Crime News : मामासोबत दारू पित असताना लोकेशने नशेत मामीसोबत संबंध ठेवल्याचीही कबूली दिली होती. त्यानंतर मामाने बायकोला या नात्याबद्दल विचारले असता तिने हा सगळा प्रकार सांगितला होता. त्यानंतर मामा मनोजने मेहुणा धर्मेंद्रसोबत मिळून लोकेशच्या हत्येचा कट रचला होता.
ADVERTISEMENT
Rajasthan Crime News : राजस्थानच्या दौसामधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या हत्येचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला तुरुंगात डांबलं होतं. त्यामुळे आता तरूणाच्या हत्येचा उलगडा होईल अशी अपेक्षा असताना या घटनेत मोठा ट्विस्ट आला. आणि तरूणाच्या हत्या प्रकरणातील दुसऱ्या एका आरोपीने रेल्वेसमोर उडी घेऊन जीव दिला होता. त्यामुळे आता तरूणाच्या हत्येनंतर दोन आरोपींनी आत्महत्या का केली? नेमका हा संपूर्ण घटनाक्रम काय आहे? हे जाणून घेऊयात. (rajsthan crime story dausa aunt nephew illicit relationship three death one murder two suicide crime news)
ADVERTISEMENT
मुळचा राजस्थानचा रहिवाशी असलेला लोकेश कामानिमित्त गुजरातला गेला होता. पण अचानक प्रवासा दरम्यानच तो बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी अनेकदा लोकेशला संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने पोलीस ठाण्यात लोकेश बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीत कुटुंबियांनी लोकेशचा मामा मनोज मीणावर संशय व्यक्त केला होता.
हे ही वाचा : काँग्रेस जिंकली तर मालमत्ता, मंगळसूत्र..?, खरगेंनी दिलं उत्तर
कुटुंबियांच्या संशयानंतर पोलिसांनी तपास केला असता मामा मनोज मीणा विरूद्द हत्येचे पुरावे सापडले होते. मनोजने लोकेशला गायबच केले नव्हते तर त्याची हत्या देखील केली होती. मनोजने लोकेशची हत्या केल्यानंतर घटनास्थळापासून दहा किलोमीटर दुर अंतरावर नदीच्या काठावर जमीनीत त्याचा मृतदेह पुरला होता.
हे वाचलं का?
या हत्येचा उलगडा केल्यानंतर पोलिसांनी मामा मनोजला तुरूंगात टाकलं होते. पोलिसांना असं वाटतं होतं की हत्येचा गुंता सुटला आहे. मात्र या दरम्यान तुरुंगात बंदिस्त असलेल्या मनोजने चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. या हत्येचा गुंता सुटत असतानाच एक मोठा ट्विस्ट समोर आला. लोकेशच्या हत्या प्रकरणातील दुसरा आरोपी असलेल्या धर्मेंद्र मीणाने जयपुर ट्रेनसमोर उडी घेऊन जीव दिला होता. लोकेशच्या हत्येनंतर धर्मेंद्र फरार होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होती. याआधीच त्याने आत्महत्या केली होती.
हे ही वाचा : अमेठी-रायबरेलीतून राहुल-प्रियांका लढणार? खरगेंचं मोठं विधान
लोकेशची हत्या का केली?
आरोपी मामा मनोज हा गुजरातमधील अंकेश्वर येथे राहून तिकडेच काम करायचा. काही वर्षानंतर त्याचा भाचा लोकेश हा मनोजच्या घरी राहण्यास आला होता. मामाच्या घरी आल्यानंतर लोकेशने मामीसोबत अनैंतिक संबंध ठेवायला सुरूवात केली होती. यातून त्याने मामीचे काही अश्लील फोटो देखील काढले. या फोटोच्या माध्यमातून नंतर लोकेशने मामीला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली होती.
ADVERTISEMENT
या दरम्यान एके दिवशी मामासोबत दारू पित असताना लोकेशने नशेत मामीसोबत संबंध ठेवल्याचीही कबूली दिली होती. त्यानंतर मामाने बायकोला या नात्याबद्दल विचारले असता तिने हा सगळा प्रकार सांगितला होता. त्यानंतर मामा मनोजने मेहुणा धर्मेंद्रसोबत मिळून लोकेशच्या हत्येचा कट रचला होता. या कटानुसार मामा आणि मेहुण्याने मिळून काही साथिदारांच्या मदतीने माधोपूर भागात लोकेशला किडनॅप करून त्याची निर्घृण हत्या केली. या हत्येपुर्वी लोकेशचा एक व्हिडिओ देखील बनवण्यात आला होता. ज्यामध्ये लोकेश आपला गुन्हा कबूल करताना दिसत होता.
ADVERTISEMENT
या घटनेतील एकाच्या हत्येने आणि दोघांच्या आत्महत्येच्या घटनेने सध्या राजस्थान हादरलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT