महाराष्ट्राला हादरवणारी बातमी... लाखभर महिला बेपत्ता, नेमकं काय घडतंय?
2019 ते 2021 या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील 1 लाख 882 मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्रातील 1 लाख 882 मुली आणि महिला बेपत्ता

न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी

गृह विभागाच्या रिपोर्टच्या आधारावर हायकोर्टात याचिका
मुंबई: लिव्ह इन रिलेशनशिप, लव्ह जिहाद, आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहसोहळे यावरून अनेक ठिकाणी वादंग पेटल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहे. दिल्लीतील आफताब पूनावाला आणि मुंबईतील मीरारोडच्या मनोज साने प्रकरणामुळं केवळ महाराष्ट्रच नाही तर देश हादरला होता. परंतु आता याच प्रकरणांशी संबंधित असलेल्या नव्या धक्कादायक अहवालामुळं आणि हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेमुळं महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
2019 ते 2021 या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील 1 लाख 882 मुली आणि महिला बेपत्ता असल्याची माहिती देत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारच्या कोषागार विभागात काम करणारे माजी सैनिक शहाजी जगताप यांनी अॅडव्होकेट मांजिरी पारसनीस यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या धक्कादायक प्रकरणाची न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> Guru Waghmare: 'स्पा'मध्ये हत्या, 'चुलबुल'नं मांडीवर 22 नावं का गोंदवलेली? चक्रावून टाकणारी Inside स्टोरी
हे प्रकरण नेमकं काय आहे?, गृहविभागाच्या रिपोर्टमधून काय समोर आलं? आणि शहाजी जगताप यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत काय म्हटलंय?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
महाराष्ट्रात लाखभर महिला बेपत्ता असल्याच्या गृह विभागाच्या रिपोर्टच्या आधारावर हायकोर्टात धाव घेणारे याचिकाकर्ते शहाजी जगताप यांची मुलगीदेखील 2021 पासून बेपत्ता आहे. सांगलीमध्ये बीएस्सीला शिकत असताना बेपत्ता झालेल्या मुलीला शोधण्यासाठी त्यांनी सांगलीतल्या संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु शोध सुरू असताना मुलीने इस्लाम धर्म स्वीकारून लग्न केल्याची माहिती जगतापांना मिळाली.