Crime News : IAS पतीला धोका, गँगस्टरवर जडला जीव अन् नको ते घडलं...
Gujrat Crime Story : गुजरात केडरचे IAS अधिकारी रणजीत कुमार यांची पत्नी सूर्या जय ही जवळपास 9 महिन्यांपूर्वी एका गँगस्टसोबत पळून गेली होती. शनिवारी (20 जुलै 2024) ती गांधीनगर येथील रणजीत कुमार यांच्या घरी पुन्हा परतली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
IAS रणजीत कुमार यांचं पत्नीसोबत नेमकं काय बिनसलं होतं?
अपहरण प्रकरणात पोलीस सूर्या जयच्या होते शोधात...
20 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न, दोन मुलांची होती आई
Gujrat Crime Story : गुजरात केडरचे IAS अधिकारी रणजीत कुमार यांची पत्नी सूर्या जय ही जवळपास 9 महिन्यांपूर्वी एका गँगस्टसोबत पळून गेली होती. शनिवारी (20 जुलै 2024) ती गांधीनगर येथील रणजीत कुमार यांच्या घरी पुन्हा परतली. तेव्हा तिला घरात एन्ट्री मिळाली नाही. त्यामुळे तिने घराबाहेरच विष प्राशन केले. त्यानंतर रविवारी रुग्णालयात उपचारादरम्यान सूर्या जय हिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्या जय ही एका लहान मुलाच्या अपहरण प्रकरणातही मुख्य आरोपी होती आणि पोलीस तिचा शोध घेत होते. (ias officer ranjeeth kumar j wife surya jay suicide case inside story her love story with gangster )
ADVERTISEMENT
सूर्या जय हिचे पती IAS रणजीत कुमार हे गुजरात विद्युत नियामक आयोगात सचिव म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रणजीत बाहेर गेले असताना ती त्यांच्या गांधीनगर येथील घरी गेली आणि घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी सूर्या जयला घरात जाऊ दिले नाही तेव्हा तिने विष प्राशन केले. याप्रकरणी गांधीनगरचे एसपी रवी तेजा वासमसेट्टी यांनी सांगितले की, पोलिसांना तिच्या मृतदेहाजवळ तमिळमध्ये लिहिलेली सुसाइड नोट सापडली आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, वाचा काय आहेत नव्या अटी शर्ती?
IAS रणजीत कुमार यांचं पत्नीसोबत नेमकं काय बिनसलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार, IAS रणजीत कुमार आणि त्यांची पत्नी सूर्या जय 2023 पासून वेगळे राहत होते. दोघेही लवकरच घटस्फोट घेणार होते. त्यांच्यातील संबंध चांगले नव्हते. रोज भांडण व्हायचे. रणजीत यांना सूर्या जय हिच्या अनैतिक संबंधांबद्दल समजलं होतं.
हे वाचलं का?
याच कारणामुळे एके दिवशी सूर्या पतीचे घर सोडून गुजरातमधून तामिळनाडूला गेली. प्रियकर राजासोबत ती तिथे राहू लागली. तिचा हा प्रियकर साधासुधा नसून गँगस्टर आहे. खूनासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांत तो सामील आहे. दोघे मिळून काहीतरी व्यवसाय सुरू करू, पतीला सोडून दे असं राजाने सूर्या जयला सांगितलं होतं. सूर्याच्याकडे भरघोस संपत्ती आहे आणि राजाची त्यावर नजर होती. तिने ते विकून त्याला पैसे द्यावेत, जेणेकरून तो व्यवसाय सुरू करू शकेल अशी त्याची इच्छा होती.
दोघंही आपापल्या व्यवसायाचा प्लॅन करतच होते तेवढ्यात पोलिसांनी राजाला खुनाच्या जुन्या गुन्ह्यात अटक केली. या प्रकरणी सूर्या जय हिच्यावर एका गुन्हेगाराला घरात आश्रय दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ती पूर्णपणे एकटी पडली. कायदेशीर लढाई लढण्यासाठी आणि व्यवसायाची तयारी करण्यासाठी झालेल्या खर्चामुळे तिला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. त्याची भरपाई म्हणून तिने आपली काही मालमत्ता लक्ष्मी नावाच्या महिलेला विकली. यानंतर ती बंगळुरूला आली. तिने तिथल्या एका कॉलेजमध्ये शेफ होण्यासाठी कोर्सला अॅडमिशन घेतले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : MNS: राज ठाकरेंची मोठी घोषणा, विधानसभा स्वबळावर लढणार.. भाजपसोबत युती नाही!
अपहरण प्रकरणात पोलीस सूर्या जयच्या होते शोधात...
कोर्ससाठी पैसे कमी पडू लागल्यावर सूर्या जयने लक्ष्मी नावाच्या महिलेला कोर्सची फी भरण्यास मदत करण्याची विनंती केली. पण तिने साफ नकार दिला. उलट पैसे हवे असतील तर आपली उरलेली मालमत्ताही विकावी, असे तिने सांगितले. यावर सूर्याला राग आला. यादरम्यान, 11 जुलै रोजी लक्ष्मीच्या मुलाचे अपहरण झाले.
ADVERTISEMENT
लक्ष्मीने सूर्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मुलाच्या सुटकेसाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, मात्र मदुराई पोलिसांनी मुलाला सुखरूप शोधून काढले. यानंतर पोलिसांनी सूर्यासह आरोपींचा शोध सुरू केला.
या प्रकरणातू वाचण्यासाठी ती कदाचित पुन्हा पतीकडे गुजरातला आली असावी. तिला वाटलं असावं की, तो तिला या कायदेशीर अडचणीतून वाचवू शकेल. पण IAS रणजीत कुमार यांनी काही वेगळाच प्लॅन केला होता. पत्नीसोबत घटस्फोट घेण्याची तयारी त्यांनी केली होती. सूर्या जयविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचीही त्यांना माहिती मिळाली होती. यामुळेच सुरक्षारक्षकाने त्यांना घरात जाण्यापासून रोखले.
हेही वाचा : Raj Thackeray : लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं, शिंदे, अजित पवारांना काय म्हणाले?
सूर्या जयला हे सर्व असह्य झाले आणि तिने घराबाहेरच विष प्राशन केले. यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना सूर्याने लिहिलेले पत्र सापडले. यामध्ये तिने पतीपासून वेगळे होण्यापासून ते प्रियकराने केलेल्या विश्वासघातापर्यंतची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. तिने लिहिले आहे की, 'ती आपल्या पतीची माफी मागण्यासाठी आली होती, जो एक चांगला माणूस आहे आणि आपल्या मुलांची चांगली काळजी घेतो.'
20 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न, दोन मुलांची होती आई
गांधीनगरचे पोलिस अधीक्षक (एसपी) रवी तेजा वासमसेट्टी यांनी सांगितले की, सूर्या फरार होती. पोलीस तिचा पाठलाग करत होते. पती पुन्हा भेटण्याच्या आशेने ती गांधीनगरला आली होती. IAS रणजीत कुमार यांच्यासोबत तिचे लग्न जवळपास 20 वर्षांपूर्वी झाले होते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले असून ती IAS रणजीत कुमार यांच्यासोबत राहतात. रणजीत कुमार 2005 बॅचचे IAS अधिकारी आहेत. सध्या ते गुजरात विद्युत नियामक आयोगाचे सचिव आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT