जावयाकडून 65 वर्षीय सासूवर बलात्कार... नंतर बेदम मारहाण करत निर्घृण हत्या! पत्नीनेच दाखल केली तक्रार
एका व्यक्तीने आपल्या सासूसोबत घृणास्पद करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती आहे. आरोपीच्या पत्नीनेच आपल्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जावयाकडून 65 वर्षीय सासूवर बलात्कार
बेदम मारहाण करत सासूची निर्घृण हत्या!
आरोपीच्या पत्नीनेच दाखल केली तक्रार
Crime News: तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या सासूसोबत घृणास्पद करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती आहे. आरोपीच्या पत्नीनेच आपल्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केल्याचं वृत्त आहे. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने दारूच्या नशेत हे निर्दयी कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
65 वर्षीय सासूवर बलात्कार...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना 8 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. त्यावेळी, पीडित वृद्ध महिला घरात एकटीच होती. आरोपीची पत्नी आणि मृत महिलेच्या मुलीने दाखल केलेल्या तक्रारीतील माहितीनुसार, 40 वर्षीय आरोपी तरुण मजूर म्हणून काम करत असून त्याला दारूचं व्यसन आहे. वृत्तानुसार, घरात एकटी असलेल्या आपल्या 65 वर्षीय सासूवर आरोपीने बलात्कार केला आणि तिची हत्या केल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: मुंबई: दिवसाढवळ्या 19 वर्षीय तरुणीवर गोळ्या झाडून खून... प्रेमत्रिकोणातून भयंकर हत्याकांड! शिवाजीनगरमध्ये खळबळ
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
संबंधित प्रकरणासंबंधी पोलिसांनी माहिती दिली की, आरोपीने वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली असल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तसेच, मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी प्रकरणाचा तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी अशीही माहिती दिली की आरोपीने दारूच्या नशेत हा गुन्हा केल्याचं दिसून येते. तक्रारीच्या आधारे, कलवाकुर्थी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
हे ही वाचा: बायकोनेच आणून दिली प्रियकराला बंदूक, नवऱ्याला संपवण्यासाठी 'असा' रचला कट
1000 रुपयांत पत्नीचा सौदा
उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातून देखील एक धक्कादायक बातमी समोर आली होती. पैशाच्या लोभापोटी एका पतीने तिच्या पत्नीवर दोन पुरुषांकडून बलात्कार घडवून आणल्याची माहिती आहे. आरोपी पतीने त्याच्या दोन मित्रांशी केवळ 1000 रुपयांत आपल्या पत्नीचा सौदा केला आणि जंगलात पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.










