बायकोनेच आणून दिली प्रियकराला बंदूक, नवऱ्याला संपवण्यासाठी 'असा' रचला कट

मुंबई तक

Crime News : तीन मुलांच्या आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्याच नवऱ्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे फेसबुकवरुन प्रेमप्रकरण जुळले होते. तिचा नवरा तिचा छळ करत असल्याचे तिने आपल्या प्रियकराला सांगितलं.  यानंतर दोघांनी मिळून नवऱ्याला संपवायचं ठरवलं. विशेष म्हणजे या महिलेनेच आपल्या प्रियकराला बंदूक आणून दिली होती. दरम्यान, या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तरप्रदेशातील झाशी जिल्ह्यातील ही घटना आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बायकोनेच आणून दिली प्रियकराला बंदूक

point

नवऱ्याला संपवण्यासाठी 'असा' रचला कट

Crime News : तीन मुलांच्या आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्याच नवऱ्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे फेसबुकवरुन प्रेमप्रकरण जुळले होते. तिचा नवरा तिचा छळ करत असल्याचे तिने आपल्या प्रियकराला सांगितलं.  यानंतर दोघांनी मिळून नवऱ्याला संपवायचं ठरवलं. विशेष म्हणजे या महिलेनेच आपल्या प्रियकराला बंदूक आणून दिली होती. दरम्यान, या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तरप्रदेशातील झाशी जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे ही वाचा : बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना विद्यार्थ्यावर काळाचा घाला; रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत

पतीच्या जाचाला कंटाळल्याने हत्या

उत्तर प्रदेशातील झाशी येथे 9 दिवसांपूर्वी झालेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. येथील रेल्वे स्टेशनच्या मागे 1 फेब्रुवारी रोजी जगभान नावाच्या व्यक्तीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला होता. या हत्येचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नी किरण हिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले आहे.  पोलिसांनी या प्रकरणी मृताची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि दुचाकी जप्त केली आहे.

फेसबुकवरुन जुळले प्रेम

मृत जगभान हा रेल्वेमध्ये वेंडर म्हणून काम करायचा आणि त्याला दारूचे व्यसन होते. तो अनेकदा पत्नी किरणला मारहाण करत असे. याच काळात, साधारण 6 महिन्यांपूर्वी किरणची फेसबुकच्या माध्यमातून शिवकुमार लोधी या तरुणाशी ओळख झाली आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. हे प्रेम इतके टोकाचे होते की, शिवकुमारने आपल्या हातावर किरणच्या नावाचा टॅटूही गोंदवून घेतला होता. पतीचा अडसर दूर करण्यासाठी किरणने स्वतः प्रियकराला बंदूक  आणून दिली आणि हत्येचा कट रचला.

हे वाचलं का?

    follow whatsapp