35 वर्षीय वासनांध काकीचे 15 वर्षांच्या पुतण्यासोबत होते 'तसे' संबंध, काकी त्यालाच घेऊन पळाली!

मुंबई तक

एक 35 वर्षीय महिला आपल्या 15 वर्षांच्या पुतण्यासोबत घरातून पळून गेल्याची चकित करणारी बातमी समोर आली आहे. दोघेही अचानक एकत्र घराबाहेर पडले पण, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत आणि तेव्हाच कुटुंबियांना याबाबत माहिती मिळाली.

ADVERTISEMENT

35 year old aunt ran away with 15 year old nephew Both found after 10 days
aunt and nephew love story
google news

बातम्या हायलाइट

point

35 वर्षीय काकी 15 वर्षांच्या पुतण्यासोबत गेली पळून!

point

10 दिवसांनंतर दोघेही सापडले पण...

Crime News: एक 35 वर्षीय महिला आपल्या 15 वर्षांच्या पुतण्यासोबत घरातून पळून गेल्याची चकित करणारी बातमी समोर आली आहे. दोघेही अचानक एकत्र घराबाहेर पडले पण, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत आणि तेव्हाच कुटुंबियांना याबाबत माहिती मिळाली. कुटुंबियांनी दोघांनाही शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यानंतर देखील त्यांना त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना आपला मुलगा आणि त्याची काकी बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही शोधून काढलं. मात्र, मुलाची काकी अजूनही त्याच्यासोबतच राहण्याच्या निर्णयावर ठाम आहे. तसेच, कुटुंबातील लोकही मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. 

संबंधित प्रकरण हे उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील पीपीगंजमधील आहे. येथे एक महिला तिच्या नववीत शिकणाऱ्या पुतण्यासोबत घरातून पळून गेली. दुपारी दोघे अचानक गायब झाल्यानंतर कुटुंबियांना वाटलं की ते फिरायला गेले आहेत. पण रात्री उशीरापर्यंत ते दोघे घरी परतले नाहीत आणि त्यांचे मोबाईल फोन सुद्धा बंद होते, त्यामुळे कुटुंबियांना त्यांची चिंता वाटू लागली. त्यांनी दोघांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण नातेवाईकांना कोणताही सुगावा न मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 

10 दिवसांनंतर शोध लागला अन्... 

पोलीस चौकशीदरम्यान, कुटुंबियांनी सांगितलं केलं की काकी आणि पुतण्या फोनवर एकमेकांसोबत तासनतास बोलायचे. मात्र, त्यावेळी घरातील कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. ते दोघे घरातून पळून गेल्यानंतर दहा दिवसांनी, सोमवारी दुसऱ्या जिल्ह्यातील पोलिसांनी या जोडप्याला अटक केली. ते पळून जाऊन लग्न करण्याचा विचार करत होते. त्यानंतर, जेव्हा त्यांना पोलिस ठाण्यात आणलं गेलं तेव्हा एक हायव्होल्टेज ड्रामा घडला. संबंधित महिलेने तिला तिच्या पुतण्यासोबतच राहण्याच्या निर्णयावर ठाम होती. अखेर, कुटुंबियांमध्ये चर्चा विनिमय झाल्यानंतर हे प्रकरण मिटलं. 

हे ही वाचा: साताऱ्यात भाजपला 'चेकमेट'; जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येण्याचे संकेत!

पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, कुटुंबियांनी कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला आहे. समुपदेशन केल्यानंतर, मुलगा घरी परतण्यास तयार झाला आणि त्याच्या काकीलाही तिच्या कुटुंबासह पाठवण्यात आले. सध्या, परिसरात या प्रकरणाची चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हे वाचलं का?