Crime : कर्जाचे हफ्ते थकवलेल्या गाडीची विक्री करून फसवणूक, व्यावसायिकाला गंडा घालणारे दोघे गजाआड

मुंबई तक

ADVERTISEMENT

crime news two businessman cheating with man selling him uncleared loan vehicle crime story
77 लाख रूपये पंकज सिंग यांच्या फर्मला वाहन खरेदी करण्यासाठी हस्तांतरित केले.
social share
google news

Crime News : मुंबईतील एका 27 वर्षीय व्यावसायिकाची वाहन खरेदीत फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. वाहन खरेदी करताना त्याच्यावर कोणतीही थकबाकी नसल्याचे चलन देण्यात आले होते. मात्र ज्यावेळेस हे वाहन मुंबईतील गोदामात घेऊन जात असताना, बँकेच्या वसूली पथकाने ते जप्त केले होते. त्यामुळे व्यावसायिकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी दोन व्यावसायिकांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (crime news two businessman cheating with man selling him uncleared loan vehicle crime story) 

ADVERTISEMENT

पिडीत व्यावसायिक अंगद सेठी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, माझी कंपनी मशीन आणि जेसीबी खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करते. मला एक वाहन खरेदी करायचे होते यासाठी मी जुलै 2023 मध्ये पंकज सिंग यांच्यासोबत व्यावसायिक करार केला होता.  पटणातील राणीसाल मेटल्स प्रायवेट लिमिटेडद्वारे विकल्या जाणाऱ्या वाहनांबद्दल सेठी यांना अनुज मिश्राने सांगितलं होतं. त्यानुसार या कंपनीकडून 77 लाख रुपयात वाहन खरेदी केले होते. पण वाहन खरेदी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांना लक्षात आले होते. 

हे ही वाचा : काँग्रेस जिंकली तर मालमत्ता, मंगळसूत्र..?, खरगेंनी दिलं उत्तर

77 लाख रूपये पंकज सिंग यांच्या फर्मला वाहन खरेदी करण्यासाठी हस्तांतरित केले. या कामासाठी कोणतीही थकबाकी नसल्याचे चलन देण्यात आले होते. पण हे वाहन मुंबईमधील गोदामात घेऊन जाताना बँकेच्या वसूली पथकाने जप्त केले. खालापूर टोल प्लाझा येथे हे वाहन बँकेंच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

हे वाचलं का?

अनुज सेठींच्या तक्रारीनंतर डिसेंबरमध्ये वाकोला पोलिसांनी पंकज सिंह, सुबीर कुमार साहू आणि इतरांविरोधात भादवि 34, 120 ब, 406 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन महिने तपास केल्यानंतर त्यांनी 2 आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपींनी वांद्रे कोर्टात जामीनासाठी अर्ज केला. कोर्टानं दोघांना प्रत्येकी 25 हजार रूपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच फायनान्स कंपन्यांनी सर्व थकबाकी 10 दिवसांमध्ये भरण्याचा आदेश दिला.

हे ही वाचा : अमेठी-रायबरेलीतून राहुल-प्रियांका लढणार? खरगेंचं मोठं विधान

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT