महिलेचा जडला भाच्यावर जीव, हॉटेलच्या बंद खोलीत दोघांनी...

मुंबई तक

crime news : महिला आपल्या भाच्याला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशातील बुलंदरशहरात पोहोचली. महिलेनं माहेरी जाते असं सांगितलं आणि ती प्रियकराला भेटण्यासाठी आली. त्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बुलंदशहरमध्ये मोठी धक्कादायक घटना

point

महिलेचे आणि तिच्या भाच्याचे एकमेकांवर जीवापाड प्रेम

Crime News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये मोठी धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं पतीला माहेरी जात असल्याची माहिती दिली होती. पण ती तिच्या भाच्यासोबत एका हॉटेलच्या खोलीत गेली. महिलेचे आणि तिच्या भाच्याचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. दोघेही प्रेमात अखंड बुडालेले होते. दोघांनीही भेटण्याचा निर्णय घेतला. अशावेळी महिला आपल्या भाच्याला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशातील बुलंदरशहरात पोहोचली. महिलेनं माहेरी जाते असं सांगितलं आणि ती प्रियकराला भेटण्यासाठी आली. 

हेही वाचा : महिलेचं परपुरूषासोबत अनैतिक संबंध, पतीला माहिती मिळताच तळपायाची आग मस्तकात अन्...

दोघेही एका हॉटेलमध्ये राहत होते, परंतु त्यांना बातमी मिळाली की, दोघांनीही खोलीत विष पिलं. कोणाच्या तरी माध्यमातून त्यांना कळले की पोलीस दोघांच्याही शोध घेत आहेत. हे कळताच दोघेही घाबरले, त्यानंतर दोघांनाही हॉटेलमध्ये विष पिलं. दोघांचीही प्रकृती बिघडल्याने दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर, त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी त्यांना सोबत घेतले. नगर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात कोणताही अहवाल दाखल करण्यात आलेला नसल्याचे नाकारण्यात आले. 

दोघेही दोन दिवसांपूर्वी घर सोडून गेले होते. महिलेचं लग्न जहांगीरबाद येथे झालं होतं. तिला दोन भाचे होते. त्यापैकी ती 17 वर्षीय भाच्यासोबत पळून गेली. त्यानंतर कुटुंबियांनी तपास केला पण ती सापडली नाही. त्यानंतर महिलेचं कुटुंब गौतमबुद्ध नगर पोलीस ठाण्यात गेले आणि महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

हेही वाचा : 'बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा', पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून पुण्यात पोस्टरबाजी

महिला आणि तरुण एका हॉटेलमध्ये राहत होते. त्यांच्या नातेसंबंधाची माहिती कळाल्यास त्यांनी विष प्राशन करत आत्महत्या केली. या प्रकरणात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच दोघांवरही उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp