प्रियकराला भेटण्यास विरोध केला..अल्पवयीन मुलीनं आईला संपवलं! चाकूने वार केले अन् नंतर...

मुंबई तक

love Story Shocking Viral News :  प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेम मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्ती काहीही करतो. पण अनेकदा प्रेमात वेडे झालेले लोक धक्कादायक कृत्य करतात.

ADVERTISEMENT

प्रतिकात्मक छायाचित्र.
प्रतिकात्मक छायाचित्र.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीने प्रियकर आणि भावाच्या मदतीने आईला संपवलं

point

आईने मुलीच्या प्रेमसंबंधाला केला होता विरोध

point

त्या गावात नेमकं काय घडलं?

love Story Shocking Viral News :  प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेम मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्ती काहीही करतो. पण अनेकदा प्रेमात वेडे झालेले लोक धक्कादायक कृत्य करतात. अशाच प्रकारची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. येथील 16 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीने तिचा प्रियकर आणि भावासोबत मिळून असं कांड केलं, जे वाचून तुमच्याही पायाखालची वाळूच सरकेल. काय आहे नेमकं प्रकरण, जाणून घ्या..

अल्पवयीन मुलीने प्रियकर आणि भावाच्या मदतीने आईची केली हत्या

हैदराबादच्या जीडीमेटला परिसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु होते. तरुणीची आई अंजलीने अनेकदा दोघांना एकत्रित पाहिलंय. त्यानंतर अंजलीने हे प्रेमप्रकरण पुढे सुरू न ठेवण्याचा मुलीला इशाराच दिला. मुलीने ऐकलं नाही, तेव्हा तिने तिचं शिक्षणही थांबवलं. 

हे ही वाचा >> तरुणाचा मोबाइल वाजला, मेसेज पाहिला अन् हादरून गेला; 'त्याने' पाठवले होणाऱ्या पत्नीचे 'ते' Video आणि...

तरुणी तिचा प्रियकर शिवसोबत 5 दिवसांपूर्वीच पळून गेली होती. त्यानंतर अंजलीने ती बेपत्ता झाल्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचं समुपदेशन करण्यात आलं आणि अंजलीसोबत तिच्या मुलीला घरी पाठवण्यात आलं. त्यानंतर रागाने फणफणलेल्या मुलीने प्रियकर आणि भाऊ यशवंतसोबत मिळून अंजलीवर चाकूने वार केले आणि तिची हत्या केली.

हे ही वाचा >> पतीने शारीरिक संबंधासाठी पत्नीला थेट पाठवलं मित्राकडे, फक्त 'या' एका गोष्टासाठी...

घटनेची माहिती मिळताच जीडीमेटला पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरु केला, अशी माहिती मृत अंजलीच्या बहिणीने दिली. अंजलीच्या मुलीने तिची ओढणी घेत तिच्या आईचा गळा आवळला, त्यामुळे ती खाली पडली. त्यानंतर प्रियकराने अंजलीच्या चेहऱ्यावर आणि कानांवर अनेक वार केले आणि तिची हत्या केली. पोलिसांनी तपासात पुष्टी केली की, अंजलीची मुलगी आणि तिच्या प्रियकराने मिळून तिची हत्या केली. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp