पतीने शारीरिक संबंधासाठी पत्नीला थेट पाठवलं मित्राकडे, फक्त 'या' एका गोष्टासाठी...
Married Woman Shocking Viral News : मध्यप्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. नात्याला काळीमा फासणार हे धक्कादायक प्रकरण आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कर्जाच्या टेन्शनमुळे पतीने पत्नीसोबत केला भयंकर प्रकार

महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल

पती आणि मित्र दोघेही आरोपी
Married Woman Shocking Viral News : मध्यप्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. नात्याला काळीमा फासणार हे धक्कादायक प्रकरण आहे. एका पतीवर आरोप लावण्यात आला आहे की, त्याने त्याच्या पत्नीला मित्रासमोरच अनैतिक संबंध करायला सांगितले. हे संपूर्ण प्रकरण इंदौरचं असल्याचं बोललं जात आहे. महिलेचं म्हणणं आहे की, तिच्या पतीने असं फक्त यासाठी केलं, कारण तो कर्ज फेडू शकला नाही. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.
महिलेनं दावा केला आहे की, तिच्या पतीला त्याच्या बालपणीचं मित्र अभिन्यूसोबत जुगार खेळायची सवय लागली. पण जेव्हा त्याने पैसे फेडले नाही, तेव्हा त्याने त्याच्या पत्नीलाच मित्रासोबत संबंध करायला सांगितले. परंतु, पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण जुगाराशी जोडलेलं नाही, असं म्हटलं आहे.
हे ही वाचा >> खासदार आणि भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर तरूणीचे लैंगिक शोषणाचे आरोप, म्हणाली आता मी...
महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल
इंदौर येथील महिलेच्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला राजस्थानची रहिवासी आहे. तिचं लग्न धार जिल्ह्यात झालं होतं. यामुळे हे प्रकरण धार पोलिसांकडे तपासासाठी ट्रान्सफर करण्यात आलं आहे.
पती आणि मित्र दोघेही आरोपी
पीडितेच्या माहितीनुसार, तिचा पती आणि त्याचा मित्र अभिमन्यु दोघांचाही या गुन्ह्यात सहभाग आहे. महिलेनं थेट लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. पोलिसांनी दोघांचा कसून तपास सुरु केला आहे.