आई आणि मुलीचा एकच बॉयफ्रेंड, दोघींनी मिळून केला भलत्याच तरुणाचा गेम
तेलंगणामध्ये राहणाऱ्या एका तरुणाची त्याच्या लग्नाच्या 30 दिवसांनंतर त्याची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यावेळी एका गाडीजवळ रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह सापडला. या हत्येसाठी नेमकं कोण जबाबदार? नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तेलंगणाच्या तरुणाची लग्नाच्या 30 दिवसांनंतर हत्या

आई आणि मुलीने मिळून केला हत्येचा प्लॅन

नेमकी घटना काय?
Telangana Crime News: तेलंगणामध्ये राहणाऱ्या तेजेश्वर नावाच्या 32 वर्षीय तरुणाचं ऐश्वर्या नावाच्या मुलीसोबत 18 मे 2025 रोजी लग्न झालं. मुलाकडच्या कुटुंबियांना ऐश्वर्या पसंत नव्हती, पण तेजेश्वरच्या प्रेमामुळे त्याचे घरचे या लग्नाला तयार झाले. अगदी आनंदात त्या दोघांचं लग्न पार पडलं आणि त्यानंतर काही दिवस त्यांचा संसार चांगला सुरू होता. मात्र, लग्नाच्या ठीक 30 दिवसांनंतर 18 जून रोजी एका गाडीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात तेजेश्वरचा मृतदेह सापडला. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
तेलंगणामध्ये राहणाऱ्या तेजेश्वरचा मृतदेह आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे सापडला होता. त्याच्याकडे जमिनीचा सर्व्हे करण्याचं लायसन्स होतं. तो तेच काम करत असायचा. तेजेश्वरचा मृतदेह सापडण्याच्या आदल्या दिवशी तो जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी गेला होता. मात्र, संध्याकाळी तो घरी परतला नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्याच दिवशी गाडीजवळ त्याचा मृतदेह सापडला.
पत्नी आणि सासूवर कुटुंबियांचा आरोप
याबद्दल पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली आणि त्यावेळी त्यावरुन तेजेश्वरची पत्नी ऐश्वर्या आणि सासू सुजाता यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सगळ्यात पत्नी आणि तिच्या आईच्या प्रियकराचा सुद्धा समावेश असल्याचं सांगितलं गेलं.
खरंतर, लग्नाआधी तेजेश्वरने त्याच्या कुटुंबियांना ऐश्वर्याबद्दल सांगितलं आणि कुटुंबियांनी होणार्या वधूबद्दल चौकशी केली. यादरम्यान, ऐश्वर्याचे एका बँक मॅनेजरशी प्रेमसंबंध असल्याचं त्यांना कळालं. हे कळाल्यानंतर त्यांनी तेजेश्वरला हे लग्न करण्यापासून रोखलं, परंतु तेजेश्वरचं ऐश्वर्यावर खूपच प्रेम असल्यामुळे त्याने त्याच्या कुटुंबियांचं काहीच ऐकलं नाही.