तरुणाचा मोबाइल वाजला, मेसेज पाहिला अन् हादरून गेला; 'त्याने' पाठवले होणाऱ्या पत्नीचे 'ते' Video आणि...
उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीचे लग्न मोडले. प्रेयसीच्या होणाऱ्या पतीला तिचे अश्लील फोटो पाठवून त्याने हे लग्न मोडलं.
ADVERTISEMENT

हल्द्वानी (उत्तराखंड): एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचं दुसरीकडे ठरलेलं लग्न मोडण्यासाठी अत्यंत टोकाचं पाऊल उचल्याचं समोर आलं आहे. उत्तराखंडच्या हल्द्वानीमधील एका तरुणाने अत्यंत घृणास्पद कृत्य करत प्रेयसीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीचं दुसऱ्या तरूणासोबत लग्न होऊ नये यासाठी प्रियकराने प्रेयसीचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या होणाऱ्या पतीला आणि तिच्या सासरकडील काही लोकांना पाठवले. त्यानंतर होणाऱ्या पतीने हे लग्न मोडलं.
लग्नाच्या अवघ्या एक आठवडा आधी हा सर्व प्रकार घडला. आता पीडित मुलीने आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.
हे ही वाचा>> पतीने शारीरिक संबंधासाठी पत्नीला थेट पाठवलं मित्राकडे, फक्त 'या' एका गोष्टासाठी...
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, मुखानी परिसरातील रहिवासी असलेल्या पीडित मुलीने सांगितले की, तिचे 6 जून रोजी खनस्यूं येथील ओखलकांडा येथील एका तरुणाशी लग्न होणार होते. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती.
होणाऱ्या पतीला आणि दिराला पाठवले तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ
तरुणीने असा आरोप केला आहे की, तिच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर मनोज सिंह चौधरीने लग्नाच्या सुमारे एक आठवडा आधी तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिच्या होणाऱ्या पती आणि दिराला पाठवले होते. या घटनेनंतरच तिचे लग्न मोडले. मनोजने यापूर्वीही पीडितेचा बनावट आयडी तयार केला होता. त्यानंतर दोन नंबरवरून अश्लील फोटो आणि काही मेसेज व्हायरल केले होते.