प्रेमात वेडीपिशी झाली..तरुणीला शोधत होते 11 राज्याचे पोलीस! अहमदाबाद प्लेन क्रॅशचं कनेक्शन आलं समोर

मुंबई तक

Bomb Threat Accused Arrested : देशभरात गुजरातसह 11 राज्यांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा मेल करणाऱ्या तरुणीला अहमदाबाद सायबर क्राईम ब्रान्चने चेन्नहून अटक केलीय

ADVERTISEMENT

Bomb Threats Culprit Arrested
Bomb Threats Culprit Arrested
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरोपी तरुणीच्या एकतर्फी प्रेमप्रकरणामुळे घडलं सर्वात मोठं कांड..

point

मेडिकल कॉलेजसह अनेक ठिकाणी पाठवले धमकीचे मेल

point

पोलिसांनी चेन्नईत आवळल्या आरोपी तरुणीच्या मुसक्या

Bomb Threat Accused Arrested : देशभरात गुजरातसह 11 राज्यांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा मेल करणाऱ्या तरुणीला अहमदाबाद सायबर क्राईम ब्रान्चने चेन्नहून अटक केलीय. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. तरुणीवर धमकीचे 21 मेल केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. परंतु, तपासादरम्यान, आरोपीने पोलिसांनी खळबळजनक माहिती दिली. आरोपी तरुणीने पोलिसांना सांगितलं की, एका व्यक्तीला अडकवण्यासाठी धमकीचे मेल पाठवले होते. त्या तरुणासोबत लग्न करायचं होतं. दरम्यान, रेनी जोशील्डा असं आरोपी महिलेचं नाव आहे. ती चेन्नईच्या एका मल्टिनॅशनल फर्ममध्ये सीनियर कन्सलटन्ट म्हणून नोकरी करते.

आरोपी तरुणीच्या एकतर्फी प्रेमप्रकरणामुळे घडलं सर्वात मोठं कांड..

मिळालेल्या माहितीनुसार, रेनी जोशील्डा दिविज प्रभाकर नावाच्या एका तरुणावर प्रेम करत होती. पण दिविजने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केलं. त्यानंतर रेनीने दिविजचा बदला घेण्याचं ठरवलं. याप्रकरणी सह पोलीस आयुक्त शरद सिंघल यांनी म्हटलं की, तरुणी दिविज प्रभाकरवर प्रेम करत होती आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. पण हे एकतर्फी प्रेम होतं. दिविजने फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केलं, तेव्हा तिचा स्वप्नभंग झाला. त्यानंतर तिने दिविजचा बदला घेण्याचा प्लॅन केला.

हे ही वाचा >> Parada ने लॉन्च केली 1 लाखांची 'कोल्हापुरी चप्पल', पण भारताला श्रेयच नाही...

मेडिकल कॉलेजसह अनेक ठिकाणी पाठवले धमकीचे मेल

तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, रेनी जोशिल्डाने खोटं ईमेल आयडी, VPN, व्हर्च्युअल नंबर आणि डार्क वेबचा वापर करून फेक ईमेल आयडी बनवला. याद्वारे आरोपी तरुणीने नरेंद्र मोदी स्टेडियम, बी जे मेडिकल कॉलेज आणि अहमदाबादच्या अनेक शाळांसह प्रमुख सर्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. दिविजला फसवण्यासाठी तिने वेगवेगळे ईमेल आयडी बनवले होते. यापैकी काही प्रभाकरच्या नावाने होते.

हे ही वाचा >> भाजप पदाधिकाऱ्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंगाचा आरोप, चहाच्या टपरीवर नेमकं काय घडलं होतं?

नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवणार..

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 दरम्यान पाकिस्तानने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानने दिलेल्या धमकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) अधिकृत इमेलवर धमकीचा मेल आला होता. यामध्ये म्हटलं होतं की, आम्ही तुमच्या स्टेडियमला उडवून टाकू. हा मेल पाकिस्तानच्या नावाने पाठवण्यात आला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp