Parada ने लॉन्च केली 1 लाखांची 'कोल्हापुरी चप्पल', पण भारताला श्रेयच नाही...

मुंबई तक

प्राडा (Parada) ने नुकतंच आपलं स्प्रिंग-समर कलेक्शन (Spring Summer 2026 Men’s collection) लॉन्च केलं आहे. या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी स्टाइल चप्पलचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या अनोख्या स्टाइल सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असताना कंपनी वादात अडकल्याचं पाहायला मिळतंय.

ADVERTISEMENT

Parada ने लॉन्च केली 1 लाखांची 'कोल्हापुरी चप्पल', पण भारताला श्रेयच नाही...
Parada ने लॉन्च केली 1 लाखांची 'कोल्हापुरी चप्पल', पण भारताला श्रेयच नाही...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

Parada च्या समर कलेक्शनमध्ये कोल्हापुरी चप्पला समावेश

point

कोल्हापुरी चप्पलच्या स्टाइलचं भारताला श्रेयच नाही

point

सोशल मीडियावर भारतीयांची तीव्र प्रतिक्रिया

Parada Spring Collection: प्राडा (Parada) ने नुकतंच आपलं स्प्रिंग-समर  कलेक्शन (Spring Summer 2026 Men’s collection) लॉन्च केलं आहे. या कलेक्शनमध्ये कोल्हापुरी स्टाइल चप्पलचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या अनोख्या स्टाइल सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असताना कंपनी वादात अडकल्याचं पाहायला मिळतंय. कंपनी या चप्पलाच्या स्टाइलचे भारताला श्रेय द्यायला विसरल्याने अचानक वाद निर्माण झाला. कोल्हापूरच्या स्थानिक कारागिरांकडे आणि या चप्पलाची खरी ओळख दुर्लक्षित झाल्यामुळे लोकांनी याबद्दलचा संताप व्यक्त केला.

सोशल मीडियावर निर्माण झाला वाद!

प्राडाच्या रनवेवर मॉडेल्सनी कोल्हापुरी चप्पल परिधान केल्याचे दिसताच लोकांनी सोशल मीडियावर यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफ अडाजानिया यांनी देखील या शोचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "ही तर आमची जुने कोल्हापुरी चप्पल आहे."

फॅशन क्रिटिक डाइट साब्यानेही त्यांच्या इंस्टाग्रामवर म्हटले आहे की, "आता आपण युरोपमध्ये फॅशन म्हणून विकल्या जाणाऱ्या 1000 यूरो (Euro) किमतीच्या प्राडाच्या कोल्हापुरी चप्पलसाठी तयार आहोत."

डाएट साब्याने असंही म्हटले की, "सध्याच्या काळात 'मेड इन फ्रान्स' आणि 'मेड इन इटली' प्रोडक्ट्सपेक्षा 'मेड इन इंडिया' प्रोडक्ट्स युरोपियन ब्रँडच्या नावाने बाजारात जास्त विकली जात आहेत. या प्रोडक्ट्सचं सर्व काम आणि आर्टिसनल फ्लेक्स भारतातच तयार केले जातात."

हे वाचलं का?

    follow whatsapp