पोलीस कर्मचाऱ्यानं लेकीला संपवलं, नंतर स्वत:चाही केला शेवट; नाशिकमधली थरकाप उडवणारी घटना काय?

मुंबई तक

पोलीस कर्मचाऱ्यानं आपली सहा वर्षीय मुलगी भैरवी हिच्यासह आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निलने नवीन घर दाखवण्याच्या बहाण्याने भैरवीला मॉडेल कॉलनीतील योगमाला अपार्टमेंटमध्ये नेलं होतं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चिमुकलीला संपवलं, नंतर स्वत:चाही शेवट केला

point

पोलीस कर्मचाऱ्यानं टोकाचं पाऊल का उचललं?

point

घटस्फोट, अपघात आणि तणाव... नातेवाईकांनी काय काय सांगितलं?

नाशिक : जेल रोडवरील मॉडेल कॉलनीत 24 जून 2025 रोजी सायंकाळी 6:15 च्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी स्वप्निल दीपक गायकवाड (वय 32) याने स्वत:ला संपवलं. तसंच आपल्या मुलीलाही गळफास दिल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. 

मुलीलाही दोरीने दिला गळफास 

पोलीस कर्मचाऱ्यानं आपली सहा वर्षीय मुलगी भैरवी हिच्यासह आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निलने नवीन घर दाखवण्याच्या बहाण्याने भैरवीला मॉडेल कॉलनीतील योगमाला अपार्टमेंटमध्ये नेलं. तिथे त्याने आधी भैरवीला नायलॉनच्या दोरीने गळफास दिला आणि नंतर स्वतः पंख्याला दोरी बांधून जीवन संपवलं.

हे ही वाचा >> "काढ व्हिडीओ, मी नाही घाबरत...", वकिलांशीही अरेरावी, ट्राफिक पोलीस कॉन्स्टेबलचा दुसरा व्हिडीओ

मागच्याच वर्षी घटस्फोट

ही घटना समजताच पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. स्वप्निलने मागील वर्षी पत्नीला घटस्फोट दिला होता आणि मुलगी भैरवीची कस्टडी त्याच्याकडे होती. तो आपल्या आईसोबत राहत होता. जुलै महिन्यात झालेल्या अपघातात त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती.

हे ही वाचा >> "नोकरी गेली, आधार नाही, समाजाची भीती...", महिलेला उच्च न्यायालयाने दिली गर्भपात करण्याची परवानगी

पायात रॉड बसवल्यानं त्याला चालणंही कठीण झालं होतं. त्यामुळे त्याच्या मानसिक तणावात वाढ झाली होती. सहकाऱ्यांसमोर त्याने अलीकडेच रडत आपली चिंता व्यक्त केली होती की, "मला काही झालं तर माझ्या मुलीचं काय होईल?" नातेवाईकांनी सांगितलं की, घटस्फोटानंतर स्वप्निल सतत मानसिक तणावात होता.

दरम्यान, या घटनेनं नाशिक शहरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये दुखद प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिक रोड पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp