Crime: मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातच पडला 3 कोटींचा दरोडा, पोलिसांना सापडलं फक्त गॅस कटर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ulhasnagar Crime News: Crime is increasing day by day in Thane district of Chief Minister Eknath Shinde. Similarly yesterday (June 28) a gold shop in Ulhasnagar was robbed. In which three crore gold was looted
Ulhasnagar Crime News: Crime is increasing day by day in Thane district of Chief Minister Eknath Shinde. Similarly yesterday (June 28) a gold shop in Ulhasnagar was robbed. In which three crore gold was looted
social share
google news

Maharashtra latest news live: उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यातील (Thane District) उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एका सोन्याच्या दुकानातून तब्बल 3 कोटींहून अधिकच्या सोन्याच्या दागिन्यांवर दरोडा (Robbery) पडल्याची घटना नुकतीच समोरी आली आहे. मंगळवारी दुकान बंद असल्याचा फायदा घेत एका वॉचमनने आपल्या साथीदारांसह उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथील विजयालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानातील कोट्यवधी रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेतील आरोपी सीसीटीव्ही कैमेऱ्यात कैद झाले असून या घटनेच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. (crime thane district chief minister eknath shinde gold shop ulhasnagar robbed 3 crore gold was looted maharashtra latest news live)

ADVERTISEMENT

नेमका कसा पडला दरोडा

उल्हासनगर कॅम्प नंबर 1 येथील शिरू चौकात विजयालक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी या परिसरातील सर्व दुकानें बंद असतात. या बंदचा फायदा घेत वॉचमनने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने सोमवारी दुकान बंद झाल्यानंतर रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास दुकानात प्रवेश करून ही चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हे ही वाचा>> PUNE: दर्शना पवारच्या हत्येसाठी नराधम राहुलने राजगड आणि सोमवारच का निवडला?

गॅस कटरचा उपयोग करून ही चोरी करण्यात आली असून घटनास्थळी तब्बल चार सिलेंडर आढळून आले आहेत. जवळपास सहा किलो सोने चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, त्याची किंमत सुमारे 3 कोटी 20 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या गुन्ह्यातील आरोपी सीसीटीव्ही कैमेऱ्यात कैद झाले असून या घटनेच्या तपासासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> शरद पवारांनी मंत्रीही ठरवले होते; फडणवीसानंतर मुनंगटीवारांचा गौप्यस्फोट

ही संपूर्ण घटना आणि आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी पथके तयार केली आहेत. या प्रकरणी काही महत्त्वाचे पुरावे देखील पोलिसांना मिळाले आहेत. ज्या आधारे दरोडेखोरांची ओळखही पटविण्यात आली आहे. या घटनेत 5 ते 6 संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. संशयितांना पकडण्यासाठी हिल लाइन, विठ्ठलवाडी आणि बदलापूर पोलीस ठाण्यांतील पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT