शरद पवारांनी मंत्रीही ठरवले होते; फडणवीसानंतर मुनंगटीवारांचा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

how ncp president sharad pawar defeated ajit pawar in political wrestling
how ncp president sharad pawar defeated ajit pawar in political wrestling
social share
google news

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमच्याबरोबर डबलगेम केला आणि ऐनवेळी पाठिंबा मागे घेतला, ज्यामुळे भाजप-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होण्यापूर्वीच कोसळले होते, असा गौप्यस्फोट उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया ऑफ एक्सचेंज या कार्यक्रमात केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबाबत (Sharad Pawar) केलेल्या या विधानावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. (sudhir mungantiwar reaction on devendra fadnavis statement about sharad pawar and alliance)

शरद पवार (Sharad Pawar) यांनी धोका दिला यात तथ्य आहेच. मंत्र्यापासून, जिल्हे, पालकमंत्री या सर्व गोष्टींचे वाटप झाले होते. पण अचानक शरद पवार यांनी निर्णय बदलला, असा गौप्यस्फोट आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सांगितले आहे. तसेच महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या होत्या. पण काँग्रेसचे तिन्ही वरिष्ठ नेते यांनी शिवसेनेला विरोध दर्शवला होता. त्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपसोबत युतीसाठी चर्चा सुरू केली होती, असे देखील सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.तसेच उद्धव जी असे करतील असं आम्हाला कधीच वाटले नव्हते,असे देखील मुनगंटीवार म्हणाले आहेत.

शिंदे-फडणवीस वादावर काय म्हणाले?

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद आहे, असा आभास निर्माण केला जातो. हे अतिशय चुकीचे आहे. एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचा, भाजपचा आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा आहे, यात कोणतीच शंका नाही, असे मोठे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  शरद पवारांनी डाव टाकला, देवेंद्र फडणवीस-अजित पवार सापडले ‘ट्रॅप’मध्ये?

एकनाथ शिंदे हिंदुत्वासाठी सत्तेला पाठ फिरवून भारतीय जनता पार्टीसोबत आले होते. पण काही लोक मुख्यमंत्री पदासाठी आल्याचा गैरसमज पसरवतात. मुख्यमंत्री हे शिंदेना करायचं हे कुठेही ठरलेले नव्हते, असे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडताना शिंदेच्या मागे 40 आमदार आले नसते, फक्त 5 आमदारचं आले असते. तरी एकनाथ शिंदे यांनी सत्तेचा त्याग केला होता, नगरविकास सारख्या मोठ्या खात्याचे ते मंत्री होते. ते मंत्रीपद सोडून आले होते. त्यामुळे विरोधी पक्षातून सत्तेत जाण्याची अनेक कारणे आहेत.पण सत्तेतून विरोधी पक्षात जाणे, हे प्रवाहाविरूद्ध लढण्याचा पराक्रम हा दिलदार आणि पराक्रमी व्यक्तीच करू शकतो, असे कौतुक देखील सुधीर मुनगंटीवार यांनी मु्ख्यमंत्री शिंदे यांचे केले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडावर प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी त्यांचा वाद, त्यांचा बंड, यात भाजप-शिवसेनेचे काहिच देणे-घेणे नाही.तसेच देव जे करतो, ते चांगलेच करतो,असे कधी कधी या घटनेतून वाटते असे मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. आषाढी एकादशी आहे, भगवान विठ्ठल त्यांच्यामध्ये (अजित पवार) असणारा असंतोष असाच ठेवो आणि भाजप-शिवसेना युतीचे सरकार विठ्ठलाच्या मार्गावर वारकरी, गरीबांसाठी कायम राहो, अशी प्रार्थना देखील त्यांनी केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  ‘एकनाथ शिंदे माझे ‘बॉस’, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण ठरवणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT