‘एकनाथ शिंदे माझे ‘बॉस’, पण…’, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण ठरवणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

who will be candidate of chief minister in maharashtra after 2024 elections. it will be decided by bjp parliamentary board
who will be candidate of chief minister in maharashtra after 2024 elections. it will be decided by bjp parliamentary board
social share
google news

Devendra Fadnavis Latest interview : ‘या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच माझे बॉस आहे. त्यांना मी बॉस म्हणून स्वीकारले आहे.’ हे विधान आहे भाजपचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे. फडणवीसांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत भूमिका मांडली. त्याचबरोबर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत कोण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल, याबद्दलही भाष्य केलं.

या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडी किती काळ एकत्र किती दिवस राहील, याविषयी शंका आहे. सत्ता हे एकत्र ठेवण्याचे साधन असते. तीनही पक्षांना विरोधी पक्षात राहणे कठीण जाते. त्यामुळे ते एकत्र निवडणुका लढतील की नाही, हे सांगता येणार नाही. भाजप-शिवसेना एकत्रितपणे निवडणुका लढवणार. आमची युती नैसर्गिक असून, शिंदे गट धनुष्यबाण चिन्हावरच निवडणुका लढवेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बॉस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्यात कोणताही बदल झालेला नाही. सुरूवातीपासून आमचे संबंध चांगले आहेत. एकमेकांचा आदर, हेच त्यामागचे कारण आहे. मी नेहमीच राजशिष्टाचाराचे पालन करतो. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो. आता उपमुख्यमंत्री आहे. शिंदे माझ्यासोबत मंत्री होते. पण आम्ही आमच्या व्यवहारात दिसू देत नाही. आता ते माझे बॉस आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते माझे नेते आहेत आणि मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आणि शिंदे हे त्यांच्या व्यवहारातून कधीही बॉस असल्याचे जाणवू देत नाही. एक जाहिरात आमचे संबंध बिघडवू शकत नाही.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2024 मध्ये चेहरा कोण असेल?

राज्यात 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जातील, याबद्दल सातत्याने चर्चा होतेय.

हेही वाचा >> कल्याण लोकसभा मतदारसंघावर हक्क कुणाचा? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

याच मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, हा निर्णय भाजप संसदीय मंडळ घेईल.” एकाच मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या विधानाचे बरेच अर्थ लावण्यास सुरूवात झाली आहे.

ADVERTISEMENT

Pasmanda Muslim: ‘या’ मुस्लिम मतांवर BJP चा डोळा का? PM मोदींची रणनीती नेमकी काय?

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉस म्हणून स्वीकारल्याचे जाहीर केलं आहे. पण, 2024 मध्ये समीकरणं तशीच असतील, याबद्दल मात्र त्यांनी सूचक विधान केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 2024 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, याचा निर्णय भाजपचं संसदीय मंडळ घेईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री कोण असेल, याचा निर्णय भाजपचं घेईल, हे फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT