Sanjay Raut : "शिंदेंनी सांगावं की, मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होते?"

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांना अटक होणार होती, यावर काय बोलले संजय राऊत?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत.
social share
google news

Sanjay Raut on Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडी सरकारकडून अटक केली जाणार होती, या एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानावर संजय राऊत यांनी भूमिका मांडली. संजय राऊत यांनी फडणवीसांवर कोणत्या प्रकरणात कारवाई होणार होती, याबद्दलही मोठा खुलासा केला. (Sanjay Raut Asked To Eknath shinde that Why was the Modi government going to arrest you?)

खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या अटकेच्या मुद्द्यावर भाष्य केलं. 

देवेंद्र फडणवीसांना अटक केली जाणार होती, या एकनाथ शिंदेंच्या विधानावर संजय राऊत म्हणाले की, "सरकार कुणालाही विनाकारण अटक करत नाही, मग आरोपी कितीही मोठा असो. कायद्यासमोर सगळे समान असतात. हे शिंदेजींचे जे बॉस आहेत, नरेंद्र मोदी त्यांचं म्हणणं आहे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"त्यामुळेच मोदीजींच्या सरकारने हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. अनेक मंत्र्यांना, आमदार-खासदारांना अटक केली. का केली, तर त्यांच्यावर कुठलातरी गुन्हा जोडला गेला", असे राऊत यावेळी म्हणाले.

फडणवीस कोणत्या प्रकरणात होते आरोपी?

"उद्धवजींचे सरकार हे फडणवीसांना अटक करणार होते, हे आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्या डोक्यात आलं कसं? काहीतरी केलं असेल ना? विनाकारण कुणी कुणाला अटक करत का? फडणवीस हे बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी होते. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास सुरू होता आणि त्यांच्या मनामध्ये भीती होती की, त्यांना अटक होईल", असे संजय राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महायुतीत शिवसेना किती लढवणार जागा? शिंदेंनीच सांगितला आकडा 

"मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना मी गुन्हा केला आहे, अशी भीती त्यांच्या मनात होती. बेकायदेशीर फोन टॅपिंग करून ऐकले. त्यासाठी दोन अधिकारी लावले होते, त्यापैकी रश्मी शुक्ला आज पोलीस महासंचालक आहेत. नंतर त्यांच्याविरुद्धचे गुन्हे मागे घेतले गेले. चौकशी व्हायला हवी होती ना, का गुन्हे मागे घेतले?", असा सवाल राऊत यांनी केला.

ADVERTISEMENT

"तुम्ही आमदार फोडा आणि आमच्याकडे या" 

"फडणवीसांच्या मनात भीती होती की, या प्रकरणात मला अटक होईल. जगभरात अशा प्रकरणात अटक होते. त्यांना तुरुंगात जावं लागतं. फडणवीस कायद्यापेक्षा मोठे आहेत का? प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध मुंबै बँकेतील घोटाळ्याप्रकरणी तपास सुरू होता. त्यांना कायदा हात लावू शकत नाही का? आशिष शेलार, प्रसाद लाड सगळ्यांविरुद्ध गुन्हे होते. तपास सुरू होता", अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

हेही वाचा >> 'महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा मिळतील', पवारांनी आकडाच सांगून टाकला! 

ते पुढे म्हणाले की, "तुम्ही एकनाथ शिंदेंनी सांगावं की, मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होते? नंतर तुम्ही दुसऱ्यांची नावे घ्या. या चार लोकांचा तपास सुरू झाल्यानंतर मोदी सरकारने एकनाथ शिंदेंवर दबाव टाकला. तुम्हाला अटक करू. तुम्ही आमदार फोडा आणि आमच्याकडे या, नाहीतर तुम्हाला अटक केली जाईल. हा खेळ आहे सगळा", असा खळबळजनक दावा राऊतांनी केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT