Pune Crime News: दर्शना पवारच्या हत्येसाठी नराधम राहुलने राजगड आणि सोमवारच का निवडला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Now a new information has come to light regarding the murder of Darshana Pawar. Accused Rahul Handore has given precise information to the police about why he chose Rajgad and Monday to kill her.
Now a new information has come to light regarding the murder of Darshana Pawar. Accused Rahul Handore has given precise information to the police about why he chose Rajgad and Monday to kill her.
social share
google news

Pune Crime News: पुणे: MPSC परीक्षेत (MPSC Exam) राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारची (Darshana Pawar) 12 जून 2023 रोजी अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली. तिचा बालपणीचा मित्र राहुल हंडोरे (Rahul Handore) यानेच तिची हत्या केली. ज्यानंतर तो फरारही झाला होता. अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) गुप्त माहितीच्या आधारे राहुलला मुंबईतून बेड्या ठोकल्या. याच प्रकरणात पोलीस तपासात नवी माहिती समोर आली आहे. हत्येची कबुली देणाऱ्या राहुल हांडोरे याने हत्येसाठी सोमवारचाच दिवस का निवडला, दर्शनाला राजगडावरच (Rajgad) का नेलं? हे सगळं आता समोर आलं आहे. जाणून घ्या त्याचविषयी सविस्तरपणे. (mpsc topper darshana pawar murder accused rahul handore pune police rajgad monday kill crime news)

कोपरगावच्या दर्शना पवारच्या हत्याकांडानं अवघा महाराष्ट्र हादरुन गेला होता. स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर शासकीय अधिकारी झालेल्या दर्शनाने खरं तर अनेक स्वप्नं पाहिली होती. MPSC मध्ये मिळवलेल्या यशाने ती हरखून गेली होती. पण राहुल हांडोरेने तिच्या सगळ्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा केला. केवळ लग्नाला नकार दिल्यानं दर्शनाचा लहानपणीचा मित्र असलेल्या राहुल हांडोरेनं तिला सोमवारी (12 जून) पुणे जिल्ह्यातील राजगडावर किल्ल्याचं पायथ्याशी नेलं. ट्रेकिंगचं कारण सांगून तो तिला राजगडावर घेऊन गेला होता.

हे ही वाचा>> तुमच्याही काळजाचा होईल थरकाप, चक्क उकळत्या दुधाने घातली बाळाला अंघोळ!

पण त्याने तिला राजगडावर न नेता पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ इथं नेलं आणि पुन्हा लग्नाचा विषय काढला. दर्शनाने यावेळीही लग्नाला नकार दिला. यावेळी चिडलेल्या राहुलने थेट कटरने मानेवर हल्ला केला. ज्यामुळे तिच्या गळ्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने शेजारीच पडलेला दगड उचलून थेट दर्शनाच्या डोक्यात घातला. ज्यानंतर त्याने पुन्हा एकदा कटरने तिच्या शरीरावर वार केले. ज्यामध्ये दर्शनाचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला. दरम्यान, हत्येच्या चार दिवसानंतर म्हणजेच 16 जूनला दर्शनाचा मृतदेह सापडला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हत्येसाठी राहुलने सोमवारच का निवडलेला?

दर्शनाच्या हत्येसाठी नराधन राहुलने सोमवारच का निवडला होता? याबद्दलची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. राजगडावर ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांची शनिवार आणि रविवारी जास्त गर्दी असते. त्या तुलनेत सोमवारी गर्दी फारच तुरळक असते. या सगळ्याचा विचार करुनच राहुलने दर्शनाच्या हत्येसाठी सोमवार निवडला होता.

हत्येनंतर राहुल बेपत्ता झाला होता. तो परराज्यात फिरत होता. अखेर मुंबईतून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. दर्शनाच्या हत्येबद्दल पुणे पोलिसांचा अजून तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखीही माहिती समोर येऊन शकते असे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात येतं आहे.

ADVERTISEMENT

राहुल हांडोरेने पुण्यातच रचलेला दर्शना पवारच्या हत्येचा कट

दर्शना ही क्लास वन अधिकारी होणार हे स्पष्ट झालं होतं. अशावेळी राहुलच्या मनात तिच्याशी लग्नाचे विचार घोळू लागलेले. त्यामुळे राहुलने ट्रेकच्या निमित्ताने याचा प्रस्ताव मांडायचा असं ठरवलं. खरं तर हा इथवर सारं काही ठीक होतं. पण ती जर नाही म्हणाली तर… हा विचार डोक्यात ठेवून राहुलने एक कट रचण्यास सुरुवात केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> शरद पवारांनी डाव टाकला, देवेंद्र फडणवीस-अजित पवार सापडले ‘ट्रॅप’मध्ये?

12 जून रोजी पुण्यातून निघाल्यानंतर राजगडच्या पायथ्याशी साधारण 8.30 च्या सुमारास दर्शना आणि राहुल पोहचले. हे अंतर पुण्यापासून साधारण 65 किमी आहे. दोघेही बाइकने राजगडच्या पायथ्यापर्यंत गेले आणि तिथे पोहचल्यावर त्यांनी ट्रेकला सुरूवात केली. याच दरम्यान जेव्हा ते सतीचा माळ येथे पोहचले तेव्हा त्यांनी तेथील एका ठिकाणी थोडासा विसावा घेतला. हीच वेळ योग्य असल्याचं पाहून राहुलने दर्शनाला सांगितलं की, त्याचं तिच्यावर प्रेम आहे आणि त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण दर्शनाने राहुलचा हा प्रस्ताव तिथल्या तिथेच फेटाळला. पण याच मुद्द्यावरून दोघांमध्ये बराच वाद झाला. यावेळी राहुलने निर्घृणपणे दर्शनाला संपवलं.

खरं तर राहुलने राजगड गाठण्याधीच म्हणजे पुण्यातच दर्शनाच्या हत्येचा कट रचला असावा असा आता पोलिसांना देखील संशय आहे. कारण अतिशय धारदार असं ब्लेड सोबत ठेवलं होतं. ब्लेड जरी छोटंसं असलं तरीही खूप इजा पोहचवणारं आहे. आता राहुलने ही ब्लेड जिथून विकत घेतली होती. ते दुकान देखील पोलिसांना सापडलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT