'अहो रात्री मोबाइल पाहू नका, गप्प..', बेडरुममध्ये येताच पत्नी असं म्हणाली अन् नको ते घडलं!
केवळ पत्नीने मोबाइल बघत राहू नका असं आपल्या पतीला सांगितल्याच्या रागातून पतीने तिची हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT

सथिनी (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील सथिनी या गावात एका महिलेची अलिकडेच हत्या झाली होती. ज्याचा छडा लावण्यात आला पोलिसांनी यश आलं आहे. महिलेच्या पतीनेच ही हत्या केल्याचं आता समोर आलं आहे. मृत महिलेने तिच्या पतीला रात्री मोबाइल पाहू नका एवढंच सांगितल्याने पती चिडला आणि त्याने पत्नीची हत्या केली. बेडरूममध्ये आल्यानंतर पत्नीने दिलेला सल्ला पतीला आवडला नाही आणि त्याने चिडून थेट आपल्या पत्नीचे तोंड ब्लँकेटने दाबून तिची हत्या केली.
दरम्यान,पत्नीच्या हत्येनंतर पतीने घरातील सामान इकडे तिकडे पसरवून ठेवलं. त्याने पोलिसांना सांगितले की काही चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसून त्याच्या पत्नीची हत्या केली.
हे ही वाचा>> 'त्यांनी' विवाहित तरूणाचा प्रायव्हेट पार्टच टाकला कापून, तरुणाने घरी जाऊन पत्नीला सांगितलं अन्...
जेव्हा पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली. पोलीस चौकशीदरम्यान, आरोपी पतीने सांगितले की, काही चोर घरात घुसले होते, ज्यांनी लाखो रुपयांचा माल चोरला होता आणि त्याच दरम्यान, पत्नीची हत्या देखील केली.
पोलिसांना आला पतीचा संशय
पती ज्या पद्धतीने पोलिसांना माहिती देत होता ते पाहाता पोलिसांना त्याचा अधिकच संशय आला. त्यामळे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. पतीचे म्हणणे आणि गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेले पुरावे या दोन्ही गोष्टी जुळत नव्हत्या. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.









