'त्यांनी' विवाहित तरूणाचा प्रायव्हेट पार्टच टाकला कापून, तरुणाने घरी जाऊन पत्नीला सांगितलं अन्...
एका तृतीयपंथीयाने तरुणाचे गुप्तांग कापून त्याला किन्नर बनविण्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये उघडकीस आला आहे.
ADVERTISEMENT

रामपूर: उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित तरुणासोबत अशी घटना घडली आहे की ऐकून सर्वांनाच हादरा बसला. तरुणाला आधी गुंगीचं औषध टाकून कोल्ड्रिंक पाजण्यात आलं आणि नंतर धारदार शस्त्राने त्याचं प्रायव्हेट पार्टच कापण्यात आलं.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तरुणाच्या पत्नीने तात्काळ पोलिसांत तक्रार केली. तसेच दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी देखील घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. ज्यानंतर एका तृतीयपंथीयासह दोघांना अटक केली. पीडितेच्या वैद्यकीय अहवालानंतर आणि चौकशीनंतर आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
पटवाई पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील रहिवासी तरुण नाच-गाण्याचे काम करतो. या कामादरम्यान त्याची तृतीयपंथी समुदायाच्या लोकांशी मैत्री झाली होती. असा आरोप आहे की, तीन-चार दिवसांपूर्वी तो बदायूं येथे एका कार्यक्रमाला जात होता. यावेळी त्याला वाटेत त्याचे काही किन्नर मित्र भेटले. जे त्याला शहाबादमधील एका गावात घेऊन गेले. इथे त्यांनी आधी त्याला कोल्ड्रिंक दिलं. पण कोल्ड्रिंक घेतल्यानंतर काही वेळातच त्याला गुंगी आली.
हे ही वाचा>> महिलेचे सुरू होते भलत्याच पुरूषासोबत अनैतिक संबंध, पती आणि दिराला समजलं अन्...
सोमवारी (30 जून) संध्याकाळी जेव्हा त्याला शुद्धीवर आले तेव्हा तो शहाबाद येथील किन्नर रवीना उर्फ रुबिना हिच्या घरी होता. पण तो ज्या अवस्थेत होता ते पाहून त्याला प्रचंड धक्का बसला. कारण लिंग परिवर्तन करण्यासाठी चक्क त्याचं गुप्तांगच कापण्यात आलं होतं.
दरम्यान, घरी पोहोचल्यानंतर त्याने घडलेला प्रकार आपल्या पत्नीला सांगितला. तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पत्नीने तातडीने पोलिसात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली.
पत्नीने पोलिसांना सांगितले की, कोल्ड्रिंकमध्ये मादक पदार्थ मिसळून ते माझ्या पतीला पिण्यासाठी दिलं. पती जेव्हा बेशुद्ध झाला तेव्हा त्याचं गुप्तांग हे लिंग परिवर्तनासाठी कापण्यात आलं.
हे ही वाचा>> शारीरिक संबंधांसाठी प्रियकर जबरदस्तीने... पहिल्या प्रियकरासोबत मिळून केला मोठा गेम!
तिने पोलिसांना हे देखील सांगितलं की, हे सर्व तिला माझ्या पतीला किन्नर बनवण्यासाठी करण्यात आले.
या प्रकरणी माहिती देताना कोतवाली प्रभारी पंकज पंत म्हणाले की, तरुणाचे गुप्तांग कापणाऱ्या किन्नर रविना आणि तिचा साथीदार विकास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.