पान मसाल्यासाठी नातवाने घेतला आजीचा जीव, अवघं कुटुंब हादरलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

grandmother refused to give gutka the grandson killed her bahraich crime
grandmother refused to give gutka the grandson killed her bahraich crime
social share
google news

Refused to Give Gutka Grandson killed Grandmother : क्षुल्लक कारणावरून हत्या किंवा आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहेत. या घटनेत एका नातवाने (Grandson) हट्ट केला होता. हा हट्ट पूरवला नसल्याने नातवाने आजीची (Grandmother) निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर आजीच्या मुलाने पोलिस ठाण्यात आपल्याच मुलाविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी (Police) आजीच्या हत्या केल्याप्रकरणी आरोपी नातवाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होतेय. (grandmother refused to give gutka the grandson killed her bahraich crime)

बहराइचच्या विशेश्वरगंज पोलीस (Police) ठाण्याच्या नेथिया माजरा भगीरथ पुरवा गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेत गुटखा खाण्याचा शौकिन असणाऱ्या एका नातवाने स्वत:च्याच आजीची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतेय.त्याचे झालं अस की, रविवारी संध्याकाळी नातू राजेशने त्याच्या 85 वर्षीय आजी राजकुमारी यांच्याकडून खाण्यासाठी पान मसाला (गुटखा) मागितला होता. मात्र आजीकडे त्यावेळेस गुटखा नव्हता. त्यामुळे तिने बाजारात गेल्यावर गुटखा घेऊन येण्याचे आश्वासन दिले होते. आणि त्या कामाला लागल्या होत्या. मात्र नातू राजेश हट्टाला पेटला होता. आणि पुन्हा गुटखा मागू लागला होता. यावर आजीने माझ्याजवळ गुटखा नाही आहे आता जीव घेतोस का? असेच म्हटले. आजीच्या याच गोष्टीवर नातू फारच तापला आणि बाजूलाच असलेला बांबू उचलून त्याने आजीवर हल्ला केला. या हल्ल्यात आजीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. या घटनेने कुटूबियांना एकच धक्का बसला होता.

हे ही वाचा : Crime: बॅगेत सापडली मुंडकं नसलेली महिला.., टॅटूमुळे सापडले नराधम मारेकरी

या घटनेनंतर कुटूंबियांनी आजीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी आजीला मृत घोषित केले होते. आजीवर हल्ला करून आरोपी नातवाने पळ काढला होता. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. तर मृत आजीचा मुलगा याने पोलिस ठाण्यात आपल्याच मुलाविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी नातवाचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : पळून जाताना नवरीसोबत प्रियकराला ग्रामस्थांनी पकडलं, मग नवऱ्याने…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT