नवऱ्याने घेतली बायकोची अग्निपरीक्षा, लग्नाच्या पहिल्याच रात्री अनैसर्गिक…
लग्न होऊन सासरी आलेल्या नववधूला लग्नाच्या पहिल्याच रात्री धक्का बसला. कारण नवरा दारू पिऊन तिच्याजवळ गेला आणि तिला त्याने वासनेची शिकार बनवली. त्यानंतर त्याला तिने समजावूनही सांगितले मात्र त्याने ऐकले नाही आणि तिच्यावर वारंवार अनैसर्गिक बलात्कार होत राहिला. त्यामुळे आता हे प्रकरण पोलिसात गेलं आहे.
ADVERTISEMENT
MP Crime : लग्नाआधी प्रत्येक मुलीला वाटत असतं की, आपल्याला नवरा (Husband) चांगला मिळावा. आपल्यावर कोणतीही परिस्थिती आली तरी तो आपली काळजी घेईल, तो आपल्यावर जीवापाड प्रेम करील असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. ते स्वप्न घेऊनच ती आपल्या पतीच्या जीवावर सासरी येते, आणि नव्या स्वप्नांना ती घडवण्याचा प्रयत्न करते. मात्र हे सगळं उलटं घडलं तर तिच्या स्वप्नांचे तुकडे होतात. त्यामुळे काही मुली (wife) कोलमडून पडतात तर काही मुली जीवनयात्रा संपवतात. तर काही मुली आयुष्यात पुन्हा उभं राहतात, नवऱ्यापासून घटस्फोट (Divorce) घेऊन आयुष्य नव्यानं सुरु करतात.
ADVERTISEMENT
लग्नाच्या पहिल्याच रात्री…
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येही असाच एक प्रकार घडला आहे. ग्वाल्हेरमधील सिरोलमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेने पोलिसात जाऊन तिने आपल्या आयुष्यातील एक घटना सांगितली. त्यावेळी पोलिसांनाही प्रचंड मोठा धक्का बसला. कारण तिने सांगितले की, माझे 8 महिन्यापूर्वी लग्न झाले होते, ती सासरी आली, आणि तिच्या आयुष्यातील संघर्षाला सुरुवात झाली. लग्नाच्या रात्री ती जेव्हा सासरच्या घरात आली त्याच रात्री तिचा नवरा दारू पिऊन तिच्याकडे गेला. तिच्यावर जबरदस्ती करू लागला. तेवढ्यावरच तो थांबला नाही तर तिच्याबरोबर जबरदस्तीनं अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवू लागला, आणि तिला शारीरिक त्रासही देऊ लागला.
हे ही वाचा >> Satara Lok Sabha : उदयनराजेंची लोकसभेसाठी फिल्डिंग! फडणवीसांना म्हणाले, ”मलाही…’
नववधू झाली सुन्न
लग्नानंतरच्या त्या रात्रीच्या धक्क्यातून ती सावरली नाही. रात्रभर ती रडत राहिली तर नवरा मात्र दारू पिऊन आपली वासनेची शिकार बनवून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी तो झोपेतून उठल्यावर त्याला तिनं रात्रीचा प्रसंग सांगत तो कसा चुकीचं वागला ते सांगू लागली. त्यावेळी तिच्या नवऱ्यानंही आपली चूक मान्य केली. नवऱ्यानंही चूक मान्य करून पुन्हा असं काही होणार नसल्याचंही त्यानं सांगितलं. त्यानं हे ही मान्य केलं की तो पुन्हा दारू पिणार नाही. नवऱ्याने आपली चूक मान्य केली, दारू पिणार नाही असं सांगितल्यावर तीही प्रचंड आनंदी झाली. त्यामुळे तिलाही आता आपल्याबरोबर असं काही होणार नाही असं वाटलं पण दुसरा दिवस उजाडला आणि तो रात्री पुन्हा दारू पिऊन नशेत तिच्याजवळ गेला. ते दृश्य पाहून मात्र ती सुन्न झाली.
हे वाचलं का?
बायकोच्या आई वडिलांवर दादागिरी
वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तिला सगळ्या क्रूरतेची हद्द पार करावी लागली, मात्र तिने हार मानली नाही. नवऱ्याला अनेकदा समजावून सांगूनही त्याला समजले नाही. त्यामुळे ती मग माहेरी निघून गेली. ती माहेरी जाताच तिच्या पाठोपाठ तोही तिथे पोहचला. त्यावेळी मात्र त्याने सगळी हद्द पार करत तिच्याबरोबर तिच्या आई वडीलांबरोबरही कसाही वागू लागला. त्याच्या या त्रासाला कंटाळूनच तिने मग थेट पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग तिने पोलिसांना सांगितला आणि नवऱ्याविरुद्ध तिने गुन्हा दाखल केला.
हुंडा पाच लाखाचा
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, लग्नात मुलीकडून मोठा हुंडाही घेतला आहे. लग्नात नवऱ्याला पाच लाख आणि दुचाकीही दिली होती. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ती जेव्हा माहेरी निघून गेली त्यावेळी सासरच्यांनी तिच्याकडे हुंडा मागायला सुरुवात केली. हुंड्याला घाबरून तरी ती पुन्हा सासरी येईल असं त्यांना वाटत होतं. मात्र आता पोलिसांनी नवऱ्यासह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता चौकशी सुरु केली असून लग्न झालं असलं तरी ती आता पुन्हा नवऱ्याकडे जाणार नाही. तर आता ती मुलगी घटस्फोट घ्यायच्या तयारीत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Suraj Chavan : काय आहे खिचडी घोटाळा, ठाकरेंचे निकटवर्तीय चव्हाणांना का झाली अटक?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT